सेंच्युरियन : पहिला एकदिवसीय सामना सहज जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाला दुखापतीने ग्रासले आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. उर्वरित एकदिवसीय सामन्यांसाठी एडेन मार्कराम याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.पहिल्या एकदिवसीय सामन्यात डू प्लेसिसच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाल्याने तो उर्वरित एकदिवसीय सामने व टी-२० मालिकेतही खेळू शकणार नाही. यापूर्वी ए. बी. डिव्हिलियर्सला तिसºया कसोटीत दुखापत झाली होती. त्यामुळे तो पहिल्या तीन एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे.एडेन मार्कराम कर्णधारदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे २३ वर्षीय एडेन मार्कराम याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मार्करामने आतापर्यंत फक्त दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. २०१७ मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने पदार्पण केले होते. दक्षिण आफ्रिका निवड समितीचे अध्यक्ष लिडा जोंडी म्हणाले,‘ हा निर्णय अवघड नव्हता.यातून निवडणार उभय संघभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे,दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम.एस. धोनी, हार्दिक पंड्या, यझुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.दक्षिण आफ्रिका : एडेन मार्कराम (कर्णधार), हशिम अमला, क्वांटन डिकॉक, जे.पी. ड्युमिनी, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, मोर्नी मोर्कल, ख्रिस मॉरिस, एल. एंगिडी, एंडीले पी., कागिसो रबाडा, तबरेज शमी, के. जोंडो, फरहान बेहार्डियेन, हेन्रिच क्लासेन.सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजता स्थळ : सुपर स्पोर्टस् पार्क
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दुसरा एकदिवसीय सामना: आफ्रिकेसमोर दुखापतींचा डोंगर, भारताचा आत्मविश्वास दुणावला
दुसरा एकदिवसीय सामना: आफ्रिकेसमोर दुखापतींचा डोंगर, भारताचा आत्मविश्वास दुणावला
पहिला एकदिवसीय सामना सहज जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाला दुखापतीने ग्रासले आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 5:28 AM