पल्लेकल : जादुई फिरकी गोलंदाज अकिला धनंजय याच्या ‘गुगली’समोर १२ धावांत ६ विकेट गमावणा-या भारताने महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रतिकूल परिस्थितीत खेळलेल्या जिगरबाज खेळीच्या बळावर श्रीलंकेवर दुस-या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात डकवर्थ लुईस नियमाद्वारे ३ गडी राखून पराभव केला.श्रीलंकेच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले. त्यांचा आघाडीची आणि फलंदाजीची मधली फळी पुन्हा कोसळली. अशातच मिलिंदा श्रीवर्धना (५८) आणि चमारा कापुगेदरा (४0) यांनी सहाव्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करताना श्रीलंकेला ८ बाद २३६ धावसंख्येपर्यंत पोहोचवले. जसप्रीत बुमराह भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४३ धावांत ४ गडी बाद केले. श्रीलंकेचा डाव संपल्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे भारताचा डाव वेळेत सुरू होऊ शकला नाही. अखेर भारताला डकवर्थ लुईस नियमाद्वारे ४७ षटकांत २३१ धावांचे आव्हान मिळाले. रोहित शर्मा (५४) आणि शिखर धवन (४९) यांनी सलामीसाठी १0९ धावांची धडाकेबाज भागीदारी केली; परंतु त्यानंतर भारताने १२ धावांच्या आतच ६ फलंदाज गमावले. त्यामुळे एकवेळ भारताची स्थिती ७ बाद १३१ अशी दयनीय होती; परंतु माजी कर्णधार धोनी (नाबाद ४५) आणि भुवनेश्वर कुमार (नाबाद ५३) यांनी आठव्या गड्यासाठी १00 धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांच्या जिगरबाज भागीदारीमुळे भारताने ४४.२ षटकांत ७ बाद २३१ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केला तसेच पाच सामन्यांच्या मालिकेत २-0 अशी आघाडी घेतली.त्याआधी श्रीलंकेने दुसºया सामन्यात धनंजय याने (५४ धावांत ६ बळी) त्याच्या कारकीर्दीतील केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर विजयाकडे मार्गक्रमण केले होते; परंतु भुवनेश्वर आणि धोनी यांनी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. या दोघांनी आठव्या गड्यासाठी विक्रमी शतकी भागीदारी केली.याआधी २00९ मध्ये हरभजनसिंग आणि प्रवीणकुमार यांनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध वडोदरा येथे ८४ धावांची भागीदारी केली होती. धोनीने आजच्या खेळीने आपल्या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याने ६८ चेंडूंत एक चौकार मारला.(वृत्तसंस्था)धावफलकश्रीलंका :- निरोशन डिकवेला झे. धवन गो. बुमराह ३१, धनुष्का गुणतिलक झे. धोनी गो. चहल १९, कुसाल मेंडिस पायचित गो. चहल १९, उपुल थरंगा झे. कोहली गो. पांड्या ०९, अँजेलो मॅथ्यूज पायचित गो. पटेल २०, मलिंदा श्रीवर्धना झे. शर्मा गो. बुमराह ५८, चामरा कपुगेदरा त्रि. गो. बुमराह ४०, अकिला धनंजय झे. पटेल गो. बुमराह ०९, दुश्मंता चमिरा नाबाद ०६, विश्व फर्नांडो नाबाद ०३. अवांतर (२२). एकूण ५० षटकांत ८ बाद २३६. बाद क्रम : १-४१, २-७०, ३-८१, ४-९९, ५-१२१, ६-२१२, ७-२२१, ८-२३०. गोलंदाजी : भुवनेश्वर १०-०-५३-०, बुमराह १०-२-४३-४, चहल १०-१-४३-२, पांड्या ५.२-०-२४-१, पटेल १०-०-३०-१, जाधव ४.४-०-३२-०.भारत : रोहित शर्मा पायचीत गो. धनंजय ५४, शिखर धवन झे. मॅथ्यूज गो. श्रीवर्धना ४९, केएल राहुल त्रि. गो. धनंजय ४, केदार जाधव त्रि. गो. धनंजय १, विराट कोहली त्रि. गो. धनंजय ४, महेंद्रसिंह धोनी नाबाद ४५, हार्दिक पंड्या यष्टि. डिकवेला गो. धनंजय 0, अक्षर पटेल पायचीत गो. धनंजय ६, भुवनेश्वर कुमार नाबाद ५३. अवांतर : १५. एकूण : ४४.२ षटकांत ७ बाद २३१. गोलंदाजी : मलिंगा ८-0-४९-0, फर्नांडो ६.२-0-३२-0, मॅथ्यूज ३-0-११-0, चमिरा ७-0-४५-0, धनंजय १0-0-५४-६, श्रीवर्धना १0-0-३९-१.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दुसरा वन-डे : भारताचा संस्मरणीय विजय, धोनी-भुवीची झुंजार खेळी, श्रीलंकेवर तीन गडी राखून मात
दुसरा वन-डे : भारताचा संस्मरणीय विजय, धोनी-भुवीची झुंजार खेळी, श्रीलंकेवर तीन गडी राखून मात
जादुई फिरकी गोलंदाज अकिला धनंजय याच्या ‘गुगली’समोर १२ धावांत ६ विकेट गमावणा-या भारताने महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रतिकूल परिस्थितीत खेळलेल्या जिगरबाज खेळीच्या बळावर श्रीलंकेवर दुस-या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात डकवर्थ लुईस नियमाद्वारे ३ गडी राखून पराभव केला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 3:22 AM