पोर्ट एलिझाबेथ - डीन एल्गर, हाशिम आमला आणि अॅबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात पहिल्या डावात २० धावांची आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने ७ बाद २६३ धावा केल्या आहेत. अॅबी डिव्हिलियर्स ८१ चेंडूंत १४ चौकारांसह ७४ धावांवर आणि व्हर्नोन फिलँडर १४ धावांवर नाबाद होते.
दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गर याने ६ चौकारांसह ५७, हाशिम आमला याने ६ चौकारांसह ५६ आणि कागिसो रबाडाने २९ धावा केल्या. आॅस्ट्रेलियाकडून मिशेल मार्श आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेने कालच्या १ बाद ३९ या धावसंख्येवरून प्रारंभ केला. पहिल्या दिवसअखेर डीन एल्गर ११, तर कागिसो रबाडा १७ धावांवर नाबाद होते. आज सकाळी कमिन्सने रबाडाला २९ धावांवर त्रिफळाबाद करीत दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला. त्यानंतर डीन एल्गर आणि हाशिम आमला यांनी तिसºया गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी करीत धावसंख्येला आकार दिला; परंतु २ बाद १५५ या भक्कम स्थितीत असणाºया दक्षिण आफ्रिकेची आॅस्ट्रेलियाने ५ बाद १७९ अशी स्थिती केली. विशेष म्हणजे जम बसलेला डीन एल्गर आणि हाशिम आमला हे लागोपाठ बाद झाले. एल्गरला हेजलवूडने तर आमला याला स्टार्कने तंबूत धाडले. फाफ-डू-प्लेसिसला (९) मिशेल मार्शने तंबूत धाडले. त्यानंतर अनुभवी अॅबी डिव्हिलियर्सने स्फोटक फलंदाजी करीत तळाच्या फलंदाजांना साथीला घेत दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.
संक्षिप्त धावफलक
आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : २४३.
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ९५ षटकांत ७ बाद २६३. (अॅबी डिव्हिलियर्स खेळत आहे ७४, डीन एल्गर ५७, हाशिम आमला ५६. पॅट कमिन्स २/५५, मिशेल मार्श २/२६).
Web Title: Second Test: South Africa first innings lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.