सेंच्युरियन : आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या दुसºया कसोटीत विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ तयारीला लागला. तथापि यजमान संघाच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी अंतिम अकरा जणांत कुणाला संधी द्यावी याची डोकेदुखी मात्र कायम आहे.पहिली कसोटी ७२ धावांनी जिंकून द. आफ्रिकेने मालिकेत आघाडी घेतल्यामुळे सलग नऊ मालिका विजयाचा भारताचा रेकॉर्ड उद्या पणाला लागणार आहे. भारताला २०१८-१९ या सत्रांत विदेशात १२ कसोटी सामने खेळायचे आहेत. ही त्यातील दुसरी कसोटी असेल. मालिकेत आव्हान टिकवायचे झाल्यास हा सामना जिंकणेही क्रमप्राप्त झाले आहे. द. आफ्रिका संघ २-० ने विजयी झाला तरी भारताच्या कसोटीतील अव्वल स्थानाला धक्का लागणार नसेल तरी भारताला मायदेशात टीकेचा सामना करावा लागेल.दुसºया सामन्यासाठी संघ निवड थंड डोक्याने करावी लागणार आहे. अद्याप ४८ तास शिल्लक असताना भारतीय खेळाडूंनी ‘सुपरस्पोर्ट्स पार्क’वर चार तासांच्या सरावात चांगलाच घाम गाळला. चेतेश्वर पुजाराला पहिल्या स्लिपमधील झेलचा तर विराट आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजीचा सराव केला. अजिंक्य रहाणेने मात्र बघ्याची भूमिका घेतली. अजिंक्य आणि शिखर धवन यांनी साहाय्यक कोच संजय बांगरसोबत थ्रो डाऊनचा सराव केला. पण दोघांनाही फलंदाजीचा सराव करता आला नाही.लोकेश राहुल, रहाणेच्या खेळण्याची शक्यता नाहीच...लोकेश राहुल, मुरली विजय आणि पुजारा यांनी नेटवर फलंदाजीचा सराव केला. हार्दिक पांड्या आणि रिद्धिमान साहा हेदेखील पाठोपाठ सरावास आले. धवनऐवजी राहुलला संधी मिळणे निश्चित आहे. विदेशातील कसोटी सामन्यात धवनचा रेकॉर्ड खराब मानला जातो. दुसरीकडे राहुल तांत्रिकदृष्ट्या भक्कम आहे. रोहित व रहाणे यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. रोहितच्या निवडीवर टीका झाल्यानंतर कोहलीला स्वत:चा बचाव करावा लागला होता.गोलंदाजीत हार्दिक पांड्याचेस्थान अबाधित असून अन्य चार गोलंदाजांची निवड करताना कोहलीला खेळपट्टीचे स्वरूप ध्यानात घ्यावे लागेल. खेळपट्टी न्यूलँडसारखीच असल्यास भारत एक फिरकी गोलंदाज कमी खेळवू शकतो. वेगवान माºयातील बदल पाहणे रंजक ठरेल. उमेश यादवनेही फलंदाजी आणि गोलंदाजीचा कसून सराव केला. तसेच, आजारातून सावरलेला ईशांत शर्मा बºयापैकी मारा करताना दिसला. कोहली मात्र बुमराहला खेळविण्याचादेखील विचार करू शकतो.भारतीय तंबूत चिंतेचे वातावरण असले तरी द. आफ्रिका संघ निश्चिंत आहे. जखमी डेल स्टेनचा पर्याय निवडण्याची मात्र चिंता असेल. युवा खेळाडू लुंगी एंगिडी याचे कसोटी पदार्पण होण्याची शक्यता आहे. अष्टपैलू ख्रिस मॉरिसदेखील खेळू शकतो. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार) , शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि पार्थिव पटेल.दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), डीन एल्गर, एडेन मर्करम, हाशिम अमला, तेम्बा बावुमा, टी डे ब्रूइन, क्वींटन डिकॉक, केशव महाराज, मोर्ने मोर्कल, ख्रिस मॉरिस, व्हर्नोन फिलॅन्डर, कागिसो रबाडा, अँडिले पी, लुंगी एंगिडी, डुआने आॅलिव्हर.स्थळ : सुपर स्पोर्ट्स पार्क सेंच्युरियनसामना : दुपारी १.३० पासून (भारतीय वेळेनुसार)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दुसरी कसोटी आजपासून : मालिकेत पुनरागमनाची धडपड, द. आफ्रिकेविरुद्ध भारतापुढे संघ निवडीचे जबर आव्हान
दुसरी कसोटी आजपासून : मालिकेत पुनरागमनाची धडपड, द. आफ्रिकेविरुद्ध भारतापुढे संघ निवडीचे जबर आव्हान
आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या दुस-या कसोटीत विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ तयारीला लागला. तथापि यजमान संघाच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी अंतिम अकरा जणांत कुणाला संधी द्यावी याची डोकेदुखी मात्र कायम आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:09 AM