पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये एक विकेट मिळवला आणि तो पॅव्हेलियनच्या दिशेने चालायला लागला. शमी पॅव्हेलियनमध्ये पोहोचला तेव्हा त्याला भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, " एक नाही आपल्याला पाच बळी मिळायला हवे." त्यावर शमीने होकारार्थी उत्तर दिले. त्याचवेळी शास्त्री यांनी शमीला 'आईस बाथ' घ्यायला सांगितला. या 'आईस बाथ'नंतर शमीने मैदानात येऊन पाच विकेट्स मिळवल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. ही 'आईस बाथ'ची कमाल होती. पण 'आईस बाथ' म्हणजे नेमके काय, हे तुम्हाला माहिती आहे का...
क्रिकेटपटू हे बऱ्याचदा 'आईस बाथ'मध्ये आंघोळ करतात. पण 'आईस बाथ'मध्ये आंघोळ करून नेमका काय फायदा होतो, हे जाणून घ्या. खेळाडू थकून आले की ते 'आईस बाथ' घेतात. बर्फाने भरलेला एक बाथटब ठेवलेला असतो, खेळाडू काही मिनिटे त्यामध्ये जाऊन आंघोळ करतात. खेळाडू 5-10 मिनिटे 'आईस बाथ' घेताना दिसतात. पण एकदा का 'आईस बाथ' घेतला की खेळाडू ताजेतवाने झालेले पाहायला मिळतात. 'आईस बाथ' घेतल्याने त्यांना लगेच आराम मिळतो.
व्यायाम केल्यावर किंवा जास्त खेळून थकल्यावर खेळाडू 'आईस बाथ' घेतात. 'आईस बाथ' घेतल्याने शरीरातील मांसपेशींना कमी नुकसान पोहोचते. त्याचबरोबर मांशपेशींचा विकास होण्यासही 'आईस बाथ'ची मदत होते.
'आईस बाथ'चे तापमान किती ठेवायचे, याचा अंदात वातावरण बघून घेतला जातो. भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी रणरणते ऊन होते. त्यामुळे जेव्हा शमी पॅव्हेलियनमध्ये आला तेव्हा त्याला 'आईस बाथ' देण्यात आला. शमीने 10 मिनिटे 'आईस बाथ' घेतला आणि त्यानंतर मैदानात जाऊन त्याने नेत्रदीपक कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला.
Web Title: Secret of Mohammed Shami's success in 'Ice Bath'; Know the truth ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.