Indian Premier League ( IPL 2020) साठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) UAEत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सातपैकी त्यांनी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी धोनीला सोशल मीडियावरून धमकी मिळाली होती आणि त्या धमकीत त्याची मुलगी झिवा हिचं नाव होतं. त्यामुळे धोनीच्या रांची येथील निवास स्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याची पत्नी साक्षी आणि पाच वर्षाची झिवा घरी आहेत.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून धोनीच्या मुलीला धमकी देण्यात आली होती. CSKने किंग्ज इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) विरुद्धचा सामना गमवल्यानंतर एका युजरने धमकी देणारा मेसेज पोस्ट केला होता. त्याच्या या धमकीचा इतरांनी चांगलाच समाचार घेतला. आकाश चोप्रा, इरफान पठाण, हर्षा भोगले आदींनी तीव्र शब्दात टीका केली. त्याच पार्श्वभूमीवर धोनीच्य रांचीतील घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनही झाला पराभवचेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) निराशाजनक कामगिरीवर सर्वच नाराज आहेत. IPL 2020मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या सामन्यात CSKला ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला. तीन वेळा IPL जेतेपद पटकावणाऱ्या CSKचा हा सात सामन्यांतील पाचवा पराभव आहे. त्यामुळे IPLच्या इतिहासात प्रथमच त्यांच्यावर प्ले ऑफच्या शर्यतीतून माघारी जाण्याची नामुष्की ओढावली आहे.