ठळक मुद्देआयसीसीने कुकच्या कारकिर्दीचा आढावा घेणार एक व्हिडीओ बनवला आहे.
लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक क्रिकेट विश्वाला निरोप देणार आहे. भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर कुक क्रिकेटला रामराम करणार आहे. या कसोटीपूर्वी कुकने काही रोमांचक गोष्टी शेअर केल्या आहेत.
कुकने सांगितले की, " एकदा माझा मृत्यू झाला आहे, अशी अफवा पसरली होती. बऱ्याच जणांना ही गोष्ट खरी वाटली होती. पण ही गोष्ट खरंच घडली आहे का, हे सर्वांना जाणून घ्यायचे होते. त्यावेळी काहींनी माझ्या मित्रांना याबाबत विचारणा केली होती. त्यांनाही ही गोष्ट माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी मी जिवंत आहे का, हे बघण्यासाठी मलाच फोन केला होता. "
कुकच्या नावावर इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाचा विक्रम आहे. पण कुकने जास्त गोलंदाजी केली नाही. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये कुके फक्त एक बळी मिळवला होता आणि तो फलंदाज होता भारताचा इशांत शर्मा. कुकने ही खास गोष्ट यावेळी शेअर केली आहे.
आयसीसीने कुकच्या कारकिर्दीचा आढावा घेणार एक व्हिडीओ बनवला आहे.
Web Title: to see if I'm alive, a friend called me ... An interesting story told by Alastair Cook
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.