चेंडू पाहून फटका मारणे माझ्या खेळीचे वैशिष्ट्य

शतकवीर ऋषभ पंत याची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 04:40 AM2021-03-06T04:40:03+5:302021-03-06T04:40:14+5:30

whatsapp join usJoin us
Seeing the ball and hitting is a feature of my game | चेंडू पाहून फटका मारणे माझ्या खेळीचे वैशिष्ट्य

चेंडू पाहून फटका मारणे माझ्या खेळीचे वैशिष्ट्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext



अहमदाबाद : अनेकदा मला माझ्या पसंतीचे फटके मारण्याची सुरुवातीलाच मुभा मिळते. शुक्रवारी मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शतकी खेळीदरम्यान फटकेबाजी करण्याआधी काही काळ खेळपट्टीवर वेळ घालविला,’ अशी प्रतिक्रिया यष्टिक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने व्यक्त केली आहे.
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी ११८ चेंडूत १३ चौकार आणि दोन षटकारांसह १०१ धावांचे योगदान देणाऱ्या ऋषभने जेम्स ॲन्डरसनच्या वेगवान चेंडूवर‘रिव्हर्स स्वीप’शॉट देखील मारला. खेळ संपल्यानंतर या विशेष रिव्हर्स स्वीप बाबत विचारताच पंत म्हणाला,‘ रिव्हर्स फ्लिकसाठी आधी योजना आखावी लागते. भाग्याची साथ लाभली तर तुम्ही जोखीमही पत्करू शकता. मला अनेकदा अशा संधी मिळतात. मात्र आज परिस्थितीनुसारच वाटचाल करायची होती. संघाला विजय मिळवून द्यायचा असल्याने असे करताना चाहत्यांचे मनोरंजन करू शकलो तर आनंद द्विगुणित होतो.’
अन्य सहकाऱ्यांना धावा काढताना त्रास जाणवत असताना पंत खेळपट्टीवर आला. २३ वर्षांच्या ऋषभने चिवट वृत्तीचा परिचय देत आक्रमक फटकेबाजी देखील केली. डॉम बेसच्या चेंडूवर षटकार खेचून त्याने शतक गाठले. तो म्हणाला, ‘गोलंदाज चांगला मारा करीत असेल तर त्याचा सन्मान करावा लागेल. एकेक धाव घेण्यास हरकत नाही.’
कोहलीचा शून्यावर बाद होण्याचा विक्रम
चौथ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदला गेला. शून्यावर बाद होण्याची त्याची १२ वी वेळ ठरली. कर्णधार म्हणून विराट आठ वेळा शून्यावर बाद झाला आहे. स्टोक्सने त्याला पाचव्यांदा भोपळा न फोडू देता बाद केले. बेन स्टोक्सच्या चेंडूवर बेन फोक्सने त्याचा झेल घेतला. या मालिकेत विराट दुसऱ्यांचा शून्यावर बाद झाला. याआधी चेन्नईत दुसऱ्या कसोटीत मोईन अली याने त्याला त्रिफळाबाद केले होते.
शून्यावर बाद झालेले खेळाडू

सौरव गांगुली १३ वेळा
विराट कोहली १२ वेळा
महेंद्रसिंग धोनी ११ वेळा
कपिल देव १० वेळा
जसप्रीत बुमराह ४ वेळा
मोहम्मद शमी ३ वेळा
चेतेश्वर पुजारा ३ वेळा

Web Title: Seeing the ball and hitting is a feature of my game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.