नॉटिंघम - पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा आठ विकेटने दारुण पराभव केला. या सामन्यामध्ये कुलदीपच्या भेदक फिरकीपुढे पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजीची दाणदाण उडाली. त्याने जेसन रॉय, जॉनी बेयरस्टॉ व जो रुट या आघाडीच्या फलंदाजांना पाठोपाठ बाद केल्याने इंग्लंडचा डाव 4 बाद 105 असा घसरला. बेन स्टोक्स, जोस बटलर यांनी 93 धावांची भागीदारी करत इंग्लंडला सावरले.
मात्र, कुलदीपने बटलरला बाद केले. यानंतर लगेच स्टोक्स व डेव्हिड विली कुलदीपचे बळी घतले. स्टोक्सने 103 चेंडूत 2 चौकारांसह 50 धावांची संयमी खेळी केली. धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात स्टोक्सने कुलदीप यादवची गोलंदाजी फोडून काढायचा प्रयत्न केला. कुलदीपने टाकलेल्या गुगलीवर रिव्हर्स स्वीप मारला. पण बॅकवर्ड पॉईंटवर उभा असेल्या सिद्धार्थ कौलने सूर मारुन उत्कृष्ठ झेल घेतला. स्टोक्सला काही वेळासाठी काही समजले नाही. भारतीय कर्णधार विराट कोहलीही कौलने घेतलेला झेल पाहतच राहिला. दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला आराम देण्यात आला त्याजागी सिधार्थ कौलाला संधी देण्यात आली होती. सिद्धार्थ यादवने भारताकडून एकदिवसीय सामन्यात काल पदार्पण केले.
कुलदीपने पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले. इंग्लंडमध्ये 6 बळी घेणारा तो पहिला फिरकीपटू तसेच एकदिवसीय सामन्यात 6 बळी घेणारा तो आठवा भारतीयही ठरला.