नवी दिल्ली : माजी सलामीवीर डब्ल्यू. व्ही. रमण यांची महिला संघाच्या मुख्य कोचपदावरून उचलबांगडी करणे आणि रमेश पोवार यांनी या पदावर पुन्हा वर्णी लावण्यात मदनलाल यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) तसेच नीतू डेव्हिड यांच्या मागर्दर्शनाखालील राष्ट्रीय निवड समिती संशयात अडकली.रमन यांच्या मागर्दर्शनात भारताचा महिला संघ ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला. त्यांना देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांपैकी एक मानले जाते.तरीही मदनलाल, सुलक्षणा नाईक आणि आर. पी. सिंग यांच्या सीएसीने कोचपदावर रमेश पोवार यांना निवडले. पोवार यांना २०१८ ला हटविण्यात आले होते. मदनलाल यांच्या समितीवर लोढा समितीच्या शिफारशीनुसार अपात्रतेचे आरोप आहेत. २० मार्च २०२१ ला त्यांनी ७० वा वाढदिवस साजरा केला. बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत ७० वर्षांची वयोमर्यादा काढून टाकण्याची विनंती केली नव्हती. मग मदनलाल यांना सीएसीच्या बैठकीत बसण्याची परवानगी का दिली?
पोवार यांच्या नियुक्तीनंतर उपस्थित झालेले प्रश्न- ७० वर्षांचे मदनलाल क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) च्या बैठकीला उपस्थित राहू शकतात का?
- रमण यांना सीएसीने विचारले,‘रमेश पोवार यांनी बांधणी केलेल्या संघाच्या यशाचे श्रेय तुम्ही कसे घेत आहात?
- सीएसीत सुलक्षणा नाईक यांचा देखील समावेश आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या त्या धाकट्या भगिनी आहेत.
गांगुली, द्रविडला पत्र‘स्टार खेळाडू हे संघापेक्षा मोठे नाहीत. कुठल्याही व्यक्तीने आत्मकेंद्रित बनू नये. याविषयी एखादा माजी खेळाडू घुसमट होत असल्याची भावना ठेवत असेल तर बीसीसीआय प्रमुख व एनसीए प्रमुखांनी याप्रकरणी निर्णय घ्यावा. महिला चॅलेंजर्स स्पर्धेच्या वेळी यूएईतील उकाड्यात मी काय केले, हे सर्वांना ठावूक असेलच.’ -डब्ल्यू. व्ही. रमण
- गांगुली आणि जय शाह हे प्रकरण कसे हाताळतील, याकडे लक्ष लागले आहे. या दोघांनी पुढील सर्व निवड बैठकांवर लक्ष ठेवावेे. रमन यांनी कोच या नात्याने चांगले काम केले, असे अनेकांचे मत आहे. - विरोधी मात्र त्यांच्यावर सराव सत्रात लक्ष देत नसल्याचा ठपका ठेवतात. एकाही खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक करीत नसल्याचा आरोप रमन यांच्या विरोधी गटाने केला.