नवी दिल्ली : भारतीय संघाचा अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगच्या मते तो आताही भारतातर्फे खेळू शकतो. हरभजन सिंगने भारतातर्फे आपला अखेरचा सामना २०१६ मध्ये आशिया कपमध्ये खेळला होता.
वृत्तसंस्थेने हरभजनच्या हवाल्याने म्हटले की, ‘मी सज्ज आहो. मी आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. टी-२० मध्ये गोलंदाजी करणे कठीण असते. कारण मैदानाचा आकार लहान असतो आणि या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू सहभागी होत असतात. त्यांच्याविरुद्ध गोलंदाजी करणे आव्हान असते. जर त्यांच्याविरुद्ध आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करू शकता तर मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करू शकता.’
तो पुढे म्हणाला, ‘ते लोक माझ्याकडे लक्ष देत नाहीत. कारण त्यांना वाटते की मी म्हातारा झालो. त्याचसोबत मी स्थानिक क्रिकेटही खेळत नाही. आयपीएलमध्ये मी चांगली कामगिरी करीत असलो तरी गेल्या चार-पाच वर्षांत त्यांनी माझ्याकडे बघितलेही नाही. मी आयपीएलमध्ये बळीही घेत आहे. आकडेवारीही माझ्या बाजूने आहे.’
भारताचा राईट आर्म आॅफ ब्रेक गोलंदाज हरभजन सिंगच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा आढावा घेतला तर त्याने भारतातर्फे १०३ कसोटी सामन्यात प्रति षटक २.८४ च्या सरासरीने धावा देताना ४१७ बळी घेतले आहेत. त्याने २५ वेळा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे. २३६ वन-डे मध्ये त्याने २६९ बळी घेतले आहे.
१६० आयपीएल सामन्यांत त्याने १५० बळी घेतले आहेत. फलंदाजीमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये हरभजनच्या नावावर दोन शतकांची नोंद आहे. त्याने ९ अर्धशतकेही झळकावली आहेत. कसोटीत त्याच्या नावावर २,२२५ धावांची, वन-डेमध्ये १,२३७ धावांची तर टी-२० मध्ये १०८ धावांची नोंद आहे. त्याने आयपीएलमध्ये ८२९ धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)
Web Title: The selection committee thinks, I am old: Bhajji
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.