मुंबई : भारतीय संघ या माहिन्याच्या अखेरीस न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ट्वेन्टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड काहीच वेळात मुंबईमध्ये होणार आहे. या संघात एका दादा खेळाडूचे पुनरागमन होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आपण जानेवारीमध्ये भारतीय संघात पुनरागमन करू, असे धोनीने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या सामन्यांसाठी धोनीला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे यावेळी धोनीला संघात स्थान देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.
24 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या दौऱ्यासाठी होणाऱ्या संघनिवडीपूर्वी अष्टपैलू हार्दिक पांड्या तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी रविवारी संघनिवड होणार आहे.
कमरेला झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या गेल्या चार महिन्यांपासून संघाबाहेर आहे. आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी तो तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमक करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र पांड्या नुकत्याच झालेल्या तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला. त्यामुळे त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे.
शनिवारी मुंबईत झालेल्या तंदुरुस्ती चाचणीत नापास झाल्यानंतर हार्दिक पांड्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारत अ संघातही स्थान देण्यात आलेले नाही. पांड्याऐवजी तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकर याला भारत अ संघात स्थान देण्यात आले आहे. भारत अ संघ न्यूझीलंडमध्ये तीन लीस्ट ए सामने खेळणार आहे.
भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, वेस्ट इंडिजनंतर नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही संघाने विजय मिळवला आहे. मात्र तळाच्या फळीत हार्दिक पांड्याची उणीव संघाला भासत आहे. त्यामुळे तंदुरुस्त झाल्यास न्यूझीलंडसारख्या महत्त्वाच्या दौऱ्यात पांड्याची भूमिका निर्णायक ठरली असती.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनीला आतापर्यंत आपण खेळलो नाही, याचा पश्चाताप झालेला नाही तर त्याने यावेळी एक मोठा खुलासा केला आहे.
विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीतपर्यंत मजल मारली होती. उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. या विश्वचषकाबाबत धोनीने एक मोठा खुलासा केला आहे.
न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर संघात बेबनाव असल्याचे पाहायला मिळाले होते. भारताचा उपकर्णधार आणि फॉर्मात असलेला रोहित शर्मा हा नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. रोहित हा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनावर नाराज होता, असे वृत्त काही जणांनी प्रसारीत केले होते. त्याचबरोबर रोहित संघाबरोबर मायदेशात परतला नव्हता. धोनीने या विश्वचषकाबाबत आणखी एक मोठा खुलासा केला आहे.
विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे रोहित, कोहली आणि लोकेश राहुल हे तिन्ही फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि धोनी यांनी संघाला जिंकवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. धावांचा पाठलाग करताना जडेजा धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण फटकेबाजीच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. त्यानंतर धोनीने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पण दुर्दैवीपणे धोनी धावचीत झाला आणि भारताच्या हातून सामना निसटला. या सामन्याबाबत धोनीने खुलासा केला आहे.
धोनीला या सामन्यातील आपल्या धावचीत होण्याचा पश्चाताप झाला. याबाबत तो म्हणाला की, " या सामन्यापूर्वीच्या लढतीतही मी धावचीत झालो होतो. त्यामुळे उपांत्य सामन्यात मी पुन्हा धावचीत झालो तेव्हा मी निराश झालो. मी यावेळी उडी मारून क्रीझमध्ये का लवकर पोहोचू शकलो नाही, या गोष्टीचा मला पश्चाताप झाला."
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सध्या सुरु आहे. धोनी यापुढे क्रिकेटच्या मैदानात दिसणार की नाही, यावर मतमतांतरे आहेत. कारण इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनी एकदाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदाात उतरलेला नाही. धोनी क्रिकेटच्या मैदानात दिसला नसला तरी आता तो एका नव्या रुपात आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या नवीन रुपात धोनी देशाची शौर्यगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
विश्वचषकानंतर आर्मीबरोबर सराव करण्यासाठी धोनी काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये होता. यावेळी त्याने आर्मीतील जवानांचे काम जवळून पाहिले आहे आणि या गोष्टीचाच फायदा धोनीला यापुढे होणार आहे. धोनी टीव्हीवर एक मालिका घेऊन येणार असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेमध्ये भारतीय सैनिकांनी शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे.
Web Title: Selection of squad to tour New Zealand a few times; The return of this player can be done
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.