नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी जाहीर झालेल्या भारताच्या संघाबाबत अजूनही बरीच चर्चा सुरू आहे. कोणला वगळले, कोणाला स्थान मिळाले, कोणाला स्थान मिळायला हवे होते, अशा चर्चा अजूनही सुरूच आहेत. पण सर्वांत रंगतदार चर्चा एका गोष्टीवर होत आहे आणि ती म्हणजे, ज्या खेळाडूंनी एकही विश्वचषकाचा सामना खेळला नाही त्यांनी विश्वचषक स्पर्धेचा संघ निवडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीच्या एकाही सदस्याने विश्वचषकाचा एकही सामना खेळलेला नाही, हे विशेष.निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आतापर्यंत १७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानंतर देवांग गांधी यांनी ४, जतीन परांजपे यांनी ४, शरणदीप सिंग यांनी ३ आणि गगन खोडाने २ एकदिवसीय सामने खेळले आहेत. दखल घेण्याची बाब म्हणजे निवड समितीमधील खोडा आणि परांजपे यांच्या नावावर एकही कसोटी सामना नाही. तसेच या निवड समितीच्या एकाही सदस्याने विश्वचषक सामना खेळलेला नाही. त्यामुळे ही समिती किती योग्य निर्णय घेऊ शकेल, असे काही जणांचे म्हणणे आहे.दुसरीकडे काहींनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. ‘काही व्यक्ती खेळाडू म्हणून महान असले तरी, ते अन्य गोष्टींमध्येही महान असतात असे नाही. तसेच, कोणी चांगला खेळाडू नसला तरी तो अन्य गोष्टीत चांगला असू शकतो,’ असे मत व्यक्त करत काहींनी अशी चर्चा करणे योग्य नसल्याचे म्हटले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- निवड समितीचे सदस्य एकही विश्वचषकाचा सामना खेळलेले नाहीत; क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली चर्चा
निवड समितीचे सदस्य एकही विश्वचषकाचा सामना खेळलेले नाहीत; क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली चर्चा
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी जाहीर झालेल्या भारताच्या संघाबाबत अजूनही बरीच चर्चा सुरू आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:22 AM