Selfish Virat Kohli Trending, World Cup 2023 IND vs NZ Live: भारतीय संघाने २००३ नंतर पहिल्यांदा विश्वचषक सामन्यात न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली. साखळी फेरीतील सामन्यात दोन तुल्यबळ संघामध्ये रोहित शर्माच्या टीम इंडियाने न्यूझीलंडला ४ गडी राखून मात दिली. न्यूझीलंडचा शतकवीर डॅरेल मिचेल याच्या १३० धावांमुळे भारताला २७४ धावांचे आव्हान मिळाले. विराट कोहलीने आव्हानाचा पाठलाग करताना ९५ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. परंतु, संघाच्या विजयाचा हिरो सोशल मीडियावर मात्र 'व्हिलन' ठरल्याचे दिसून आले. यामागे नक्की कारण काय, जाणून घेऊया.
सूर्यकुमारचा रन-आऊट
न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात दोन-तीन वेळा असा प्रसंग आला, ज्यावेळी विराटने केलेल्या कृतीला नेटकऱ्यांनी 'स्वार्थीपणा' असे नाव दिल्याचे दिसले. पहिल्यांदा सूर्यकुमार यादव याच्या रनआऊटच्या वेळी झालेला गोंधळ चाहत्यांना रूचला नाही. सूर्याने फटका मारून एक धाव काढण्यासाठी आवाज दिला. विराटदेखील धावायला निघाला, पण मध्येच विराटने धाव घेण्यास नकार दिला. त्यावेळी सूर्यकुमार नॉन स्ट्राईकच्या जवळ पोहोचला होता, पण विराट पिचवर सेट असल्याने सूर्याने आपल्या विकेटचे बलिदान दिले. त्यानंतर अनेक ट्विटमध्ये विराट टीकेचा धनी ठरला.
----
रविंद्र जाडेजाला नाकारली धाव
सामन्यात जास्त चेंडूत कमी धावांची आवश्यकता होती. त्यावेळी रविंद्र जाडेजा एकेरी आणि दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. सामना लवकर संपवून नेट रनरेटमध्ये फायदा करण्याचा त्याचा उद्देश होता. मात्र एका वेळी सहजपणे दोन धावा मिळू शकत असूनही विराटने एक धाव काढल्यावर जाडेजाला दुसऱ्या धावेसाठी नकार दिला आणि स्ट्राईक स्वत:कडे ठेवली. त्याच्या या निर्णयाने जाडेजाने देखील मैदानात उघड उघड नाराजी व्यक्त केली. तसेच नेटकऱ्यांनीही त्याला खडेबोल सुनावले.
----
शतकाच्या प्रयत्नात ९५ धावांवर बाद
शतकाच्या जवळ आलेला असताना विराट कोहलीने धावांची गती संथ केली. तसेच स्ट्राईक स्वत:कडे राहावी यासाठी एकेरी धावही नाकारली. त्यानंतर एक मोठा फटका मारून सामना संपवावा आणि शतक पूर्ण करावे असा विराटचा विचार होता. पण त्याचा फटका चुकला आणि तो ९५ धावांवर बाद झाला. त्याच्या बाद होण्याचा व्हिडीओही बऱ्याच नेटकऱ्यांनी पोस्ट केला आणि त्याच्यावर टीका केली.
----
Web Title: Selfish Virat Kohli Trending on Social Media after Ind vs NZ World Cup 2023 match Suryakumar Yadav Controversy Century Greed watch twitterati post
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.