Semi Final Scenario : २ जागा, ५ स्पर्धक! आज एक जागाही जाणार? मग चौघांमध्ये खरी चुरस रंगणार

ICC ODI World Cup 2023 Semi Final Scenario : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 03:51 PM2023-11-07T15:51:10+5:302023-11-07T15:51:35+5:30

whatsapp join usJoin us
Semi Final Scenario : Two spots, five teams! How the semi-final scenarios look heading into the business end of CWC23 | Semi Final Scenario : २ जागा, ५ स्पर्धक! आज एक जागाही जाणार? मग चौघांमध्ये खरी चुरस रंगणार

Semi Final Scenario : २ जागा, ५ स्पर्धक! आज एक जागाही जाणार? मग चौघांमध्ये खरी चुरस रंगणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 Semi Final Scenario : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे उर्वरित दोन जागेसाठी ५ स्पर्धक उरले आहेत. ऑस्ट्रेलियाने आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यास, तिसरे स्थानही पक्के होईल. मग, उपांत्य फेरीच्या १ जागेसाठी ४ स्पर्धक उरणार आहेत. न्यूझीलंड आमइ पाकिस्तान हेही सध्या बाद फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पाकिस्ताननेन्यूझीलंडवर विजय मिळवून स्वतःला स्पर्धेत कायम ठेवले होते.  
  
भारत
विजय - ८
पराभव - ०
नेट रन रेट - +२,५४६ 
उर्वरित सामना - नेदरलँड्स ( १२ नोव्हेंबर) 
उपांत्य फेरीसाठी पात्र  


दक्षिण आफ्रिका
विजयः ६
नुकसान: 2
नेट रन रेट: +१.३७६ 
उर्वरित सामना : अफगाणिस्तान (१० नोव्हेंबर)
उपांत्य फेरीसाठी पात्र  

ऑस्ट्रेलिया
विजय: ५
नुकसान: २
नेट रन रेट: +०.९२४
उर्वरित सामना - अफगाणिस्तान ( आता सुरू आहे), बांगलादेश ( ११ नोव्हेंबर ) 

उपांत्य फेरीचे गणित 
- उर्वरित दोन्ही सामने जिंकून १४ गुणांसह उपांत्य फेरीचे स्थान पक्के
- एक सामना जिंकल्यास १२ गुण होतील आणि तरीही त्यांचे उपांत्य फेरीतील जागा पक्की होईल
- दोन्ही सामने पराभूत झाल्यास त्यांना १० गुणांवर समाधानी रहावे लागेल. त्यानंतर नेट रन रेटवर गणित अवलंबून असेल आणि न्यूझीलंड, अफगाणिस्ता, पाकिस्तान यापैकी किमान २ संघांपेक्षा त्यांना त्याचा नेट रन रेट चांगला ठेवावा लागेल

न्यूझीलंड  
विजय - ४
पराभव - ४ 
नेट रन रेट - +०.३९८ 
उर्वरित सामना - श्रीलंका ( ९ नोव्हेंबर ) 

उपांत्य फेरीचे गणित 

 - उर्वरित सामना जिंकून त्यांना १० गुण करता येतील आणि ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान यापैकी किमान दोन संघांसह चांगला नेट रन रेट ठेवावा लागेल. 
- अखेरच्या साखळी सामन्यात हार झाल्यास त्यांना ८ गुणांवर समाधानी रहावे लागेल. त्याचवेळी त्यांना पाकिस्तान व अफगाणिस्तान यांचा उर्वरित सामन्यात परभवाची प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतरही नेट रन रेट निर्णायक ठरेल. 
 
पाकिस्तान 
विजय - ४
पराभव - ४ 
नेट रन रेट - +०.०३६ 
उर्वरित सामना - इंग्लंड ( ११ नोव्हेंबर )  

उपांत्य फेरीचं गणित
- शेवटच्या सामन्यात विजयासह १० गुण कमावता येईल आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान यांच्यापैकी किमान दोघांना नेट रन रेटच्या बाबतित मागे टाकावे लागेल.
- शेवटचा सामना गमावल्यास त्यांचे ८ गुण होतील. मग त्यांना न्यूझीलंड व अफगाणिस्तानच्या पराभवाची प्रतीक्षा पाहावी लागेल. त्याहीनंतर नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल
 
अफगाणिस्तान
विजय - ४ 
पराभव - ३  
नेट रन रेट -०.३३०
उर्वरित सामना - ऑस्ट्रेलिया ( आज सुरू आहे), दक्षिण आफ्रिका ( १० नोव्हेंबर)  

उपांत्य फेरीचं गणित
- दोन्ही सामने जिंकून १२ गुणांसह उपांत्य फेरीचे स्थान पटकावता येईल 
- एक विजय मिळवल्यास त्यांचे १० गुण होतील आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यापैकी दोन संघांपेक्षा नेट रन रेट चांगला ठेवावा लागेल.  
- दोन्ही सामने गमावल्यास त्यांचे ८ गुण राहतील. मग पाकिस्तान व न्यूझीलंड यांची हार त्यांना वाचवू शकते.  

Web Title: Semi Final Scenario : Two spots, five teams! How the semi-final scenarios look heading into the business end of CWC23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.