ICC ODI World Cup 2023 Semi Final Scenario : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे उर्वरित दोन जागेसाठी ५ स्पर्धक उरले आहेत. ऑस्ट्रेलियाने आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यास, तिसरे स्थानही पक्के होईल. मग, उपांत्य फेरीच्या १ जागेसाठी ४ स्पर्धक उरणार आहेत. न्यूझीलंड आमइ पाकिस्तान हेही सध्या बाद फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पाकिस्ताननेन्यूझीलंडवर विजय मिळवून स्वतःला स्पर्धेत कायम ठेवले होते. भारतविजय - ८पराभव - ०नेट रन रेट - +२,५४६ उर्वरित सामना - नेदरलँड्स ( १२ नोव्हेंबर) उपांत्य फेरीसाठी पात्र
दक्षिण आफ्रिकाविजयः ६नुकसान: 2नेट रन रेट: +१.३७६ उर्वरित सामना : अफगाणिस्तान (१० नोव्हेंबर)उपांत्य फेरीसाठी पात्र
ऑस्ट्रेलियाविजय: ५नुकसान: २नेट रन रेट: +०.९२४उर्वरित सामना - अफगाणिस्तान ( आता सुरू आहे), बांगलादेश ( ११ नोव्हेंबर )
उपांत्य फेरीचे गणित - उर्वरित दोन्ही सामने जिंकून १४ गुणांसह उपांत्य फेरीचे स्थान पक्के- एक सामना जिंकल्यास १२ गुण होतील आणि तरीही त्यांचे उपांत्य फेरीतील जागा पक्की होईल- दोन्ही सामने पराभूत झाल्यास त्यांना १० गुणांवर समाधानी रहावे लागेल. त्यानंतर नेट रन रेटवर गणित अवलंबून असेल आणि न्यूझीलंड, अफगाणिस्ता, पाकिस्तान यापैकी किमान २ संघांपेक्षा त्यांना त्याचा नेट रन रेट चांगला ठेवावा लागेल
न्यूझीलंड विजय - ४पराभव - ४ नेट रन रेट - +०.३९८ उर्वरित सामना - श्रीलंका ( ९ नोव्हेंबर )
उपांत्य फेरीचे गणित
- उर्वरित सामना जिंकून त्यांना १० गुण करता येतील आणि ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान यापैकी किमान दोन संघांसह चांगला नेट रन रेट ठेवावा लागेल. - अखेरच्या साखळी सामन्यात हार झाल्यास त्यांना ८ गुणांवर समाधानी रहावे लागेल. त्याचवेळी त्यांना पाकिस्तान व अफगाणिस्तान यांचा उर्वरित सामन्यात परभवाची प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतरही नेट रन रेट निर्णायक ठरेल. पाकिस्तान विजय - ४पराभव - ४ नेट रन रेट - +०.०३६ उर्वरित सामना - इंग्लंड ( ११ नोव्हेंबर )
उपांत्य फेरीचं गणित- शेवटच्या सामन्यात विजयासह १० गुण कमावता येईल आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान यांच्यापैकी किमान दोघांना नेट रन रेटच्या बाबतित मागे टाकावे लागेल.- शेवटचा सामना गमावल्यास त्यांचे ८ गुण होतील. मग त्यांना न्यूझीलंड व अफगाणिस्तानच्या पराभवाची प्रतीक्षा पाहावी लागेल. त्याहीनंतर नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल अफगाणिस्तानविजय - ४ पराभव - ३ नेट रन रेट -०.३३०उर्वरित सामना - ऑस्ट्रेलिया ( आज सुरू आहे), दक्षिण आफ्रिका ( १० नोव्हेंबर)
उपांत्य फेरीचं गणित- दोन्ही सामने जिंकून १२ गुणांसह उपांत्य फेरीचे स्थान पटकावता येईल - एक विजय मिळवल्यास त्यांचे १० गुण होतील आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यापैकी दोन संघांपेक्षा नेट रन रेट चांगला ठेवावा लागेल. - दोन्ही सामने गमावल्यास त्यांचे ८ गुण राहतील. मग पाकिस्तान व न्यूझीलंड यांची हार त्यांना वाचवू शकते.