भारतात क्रिकेटचं वेडं कितीय, हे वेगळं सांगायला नको... क्रिकेटपटूंच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उतावळे झालेले असतात. त्यामुळेच सोशल मीडियावर क्रिकेटपटूंपासून त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनाही चाहते फॉलो करत असतात... भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक आणि दिग्गज स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल हा पती-पत्नीमध्ये झालेली तू तू मै मै जगासमोर आली आहे. नुकतंच दिनेशने एक ट्विट करून आपल्या वैवाहिक आयुष्यातील एक प्रसंग सर्वांसोबत शेअर केला आहे.
दिनेश कार्तिकसोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतो. तो नेहमी त्याच्या जीवनातील अनेक अपडेट्स तसेच विविध विषयांवर आपले मत मांडत असतो. त्याने एक ट्विट केले आणि त्यात पत्नीसोबत घडलेला प्रसंग वेळेसह मांडला... त्याने लिहिले,''पहाटे ४.२५ वाजता - मी उठलो आणि परत झोपी गेलो. दीपिका काहीतरी बडबडली. मी अर्ध्या झोपेत होतो आणि म्हणालो - ठीक आहे. दीपिका म्हणाली - मी काहीही विचारले तर तू उत्तर देत नाहीस. सकाळी ७ वाजता मी म्हणालो - कॉफी प्लीज. दीपिकाचे उत्तर - जा आणि स्वतः बनव.''
दिनेशने आपल्या वैवाहिक आयुष्यातील हा प्रसंग सांगून ट्विटमध्ये म्हटले, मला माहित होते की हे होणार आहे. माझ्यासारखाच अनुभव इतर कोणाला आला आहे का? कार्तिकच्या पोस्टला चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कार्तिकने २६ कसोटींत १ शतक व ७ अर्धशतकांसह १०२५ धावा केल्या आहेत. ९४ वन डे व ६० ट्वेंटी-२० सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे १७५२ व ६८६ धावा आहेत.
Web Title: Senior India cricketer Dinesh Karthik posted a hilarious tweet about a funny morning incident between him and his wife Dipika Pallikal that has gotten the fans laughing their hearts out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.