Join us  

श्रीलंकेविरुद्धची मालिका सर्वांसाठी कौशल्य दाखविण्याची संधी : धवन

नियमित कर्णधार विराट कोहली व मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे धवन श्रीलंकेविरुद्ध पुढील महिन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भुवनेश्वर कुमार संघाचा उपकर्णधार राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 5:07 AM

Open in App

मुंबई : आगामी मालिका आव्हान असून दुय्यम दर्जाच्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखवित मुख्य संघात स्थान मिळविण्याची संधी मिळेल, असे मत श्रीलंका दौऱ्यात मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या शिखर धवनने व्यक्त केले. धवनने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या उपस्थितीत संघ रवाना होण्यापूर्वी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की,‘हा चांगला संघ आहे. आमच्या संघात सकारात्मक व विश्वास आहे. प्रत्येकाला चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे. खेळाडू उत्साहित आहेत. हे नवे आव्हान आहे, पण त्याचसोबत आम्हा सर्वांसाठी आपले कौशल्य दाखविण्याची शानदार संधी आहे. प्रत्येक खेळाडू याची प्रतीक्षा करीत आहे. आम्ही विलगीकरणात १३-१४ दिवस घालविले आणि खेळाडू मैदानावर उतरण्यासाठी उत्सुक आहेत. आमच्याकडे तयारीसाठी १०-१२ दिवसांचा कालावधी आहे.’

नियमित कर्णधार विराट कोहली व मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे धवन श्रीलंकेविरुद्ध पुढील महिन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भुवनेश्वर कुमार संघाचा उपकर्णधार राहील. भारतीय संघ श्रीलंकेत तीन वन-डे आंतरराष्ट्रीय व एवढेच टी-२० सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात १३ जुलैला व समारोप २५ जुलैला होईल. भारतीय क्रिकेट बोर्डने दौऱ्यासाठी २० सदस्यांच्या संघाची निवड केली आहे. त्यात हार्दिक पांड्या व फिरकीपटू कुलदीप यादव युजवेंद्र चहल यांचाही समावेश आहे. युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल व पृथ्वी शॉ यांच्या कामगिरीवरही नजर राहील. 

संघात इशान किशन व संजू सॅमसनच्या रुपाने दोन यष्टिरक्षक आहेत.संघ संयोजनाबाबत बोलताना धवन म्हणाला,‘खेळाडू सज्ज असून सामने खेळण्यासाठी आतूर आहेत. या खेळाडूंनी आयपीएल व अन्य स्पर्धांमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. संघात युवा व अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे.’

श्रीलंकेत सर्व युवांना संधी देणे अशक्य : द्रविडमुंबई : मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवड झालेल्या सर्व युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, हे शक्य नसल्याचे  श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले.युवा      खेळाडू यंदा होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी आपल्या कामगिरीच्या आधारावर निवड समितीचे लक्ष वेधण्यास उत्सुक आहेत. n शिखर धवनच्या नेतृत्वाखाली कमी अनुभव असलेला संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यात आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या सहा खेळाडूंचा समावेश आहे.n  द्रविड  म्हणाले,‘या छोटेखानी दौऱ्यात आमच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे आहे.

, असे विचार करणे अवास्तविक ठरेल. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-२० व तीन वन-डे सामने खेळणार आहे. निवड समिती सदस्यही या दौऱ्यात राहणार आहेत.’यंदा विश्वकप स्पर्धेसाठी टी-२० संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत ईशान किशन, सूर्यकुमार यादव व संजू सॅमसन या त्रिकुटाचा समावेश आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका १३ जुलैला खेळल्या जाणाऱ्या वन-डे लढतीपासून सुरू होईल. त्यानंतर २१ जुलैपासून टी-२० सामने खेळले जातील.

पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार विश्वकप स्पर्धा भारतात होणार होती, पण कोविड-१९ महामारीमुळे याचे आयोजनत ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहे.श्रीलंकेत वन-डे सामन्यांच्या तुलनेत तीन टी-२० सामने अधिक महत्त्वाचे ठरती. कारण विश्वकप स्पर्धेपूर्वी भारतासाठी हे शेवटचे आंतरराष्ट्रीय सामने असतील.

भारताचे माजी कर्णधार द्रविड म्हणाले,‘या संघातील अनेक खेळाडू आगामी विश्वकप स्पर्धेत संघातील आपले स्थान पक्के करण्यास प्रयत्नशील आहेत. पण माझ्या मते संघातील प्रत्येकाचे मुख्य लक्ष्य मालिका जिंकण्याचा प्रयत्न करण्याचे असायला हवे.’

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघशिखर धवन