Join us  

श्रीलंकेविरुद्धची मालिका निर्णायक ठरेल : उनाडकट

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील चांगली कामगिरी कारकिर्दीसाठी निर्णायक ठरेल, अशी प्रतिक्रिया वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने व्यक्त केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:55 AM

Open in App

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील चांगली कामगिरी कारकिर्दीसाठी निर्णायक ठरेल, अशी प्रतिक्रिया वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने व्यक्त केली.सौराष्ट्रच्या या वेगवान गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध तिसºया व अखेरच्या टी-२०मध्ये १५ धावांत दोन बळी घेतले. रविवारी खेळल्या गेलेल्या या लढतीत भारताने ५ गडी राखून विजय मिळवला. उनाडकटने कटकमध्ये ७ धावांत १ आणि इंदूरमध्ये २२ धावांत एक बळी घेतला होता. तो म्हणाला,‘या मालिकेमुळे माझा आत्मविश्वास उंचावला.ही मालिका माझ्या कारकिर्दीला नवे वळण देणारी ठरेल.’(वृत्तसंस्था)