इंग्लंड दौरा हा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेचा राहिला आहे. या दौऱ्यावर असलेल्या स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने ही मालिका जिंकून त्यात मोलाचे योगदान देण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ‘लोकमत’चे संपादकीय सल्लागार अयाझ मेमन यांनी अजिंक्य रहाणे याची ही विशेष मुलाखत घेतली. या वेळी अजिंक्यने इंग्लंड दौºयासोबतच आपल्या ‘आउटफिल्ड’ गोष्टीही शेअर केल्या.
इंग्लंड दौ-यासाठी कशाप्रकारे तयारी केली?
- मला वाटतं इंग्लंडचा दौरा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानुसार तयारीही जोरदार केली आहे. या दौºयासाठी मी दोन आठवडे बीकेसीमध्ये सराव केला. इंग्लंडमध्ये कशाप्रकारची आव्हाने असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ती आव्हाने डोळ्यांपुढे ठेवून मी पूर्ण तयारी केली आहे.
तिथे तुझी राहुल द्रविडसोबत भेट होईल. त्यांची मदत होईल?
- नक्कीच. राहुल द्रविड यांनी इंग्लंडमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरेल. मी त्यांच्याकडून जास्तीत जास्त टिप्स घेण्याचा प्रयत्न करेन.
राहुल द्रविड जेव्हा जेव्हा जवळ असतात तेव्हा खूप उपयोगी ठरतात. ते मला नेहमीच प्रोत्साहन देतात.
तू इंग्लंडमध्ये काही सराव सामनेही खेळणार आहेस. त्याबद्दल...
- होय... मी इंग्लंडमध्ये सरावे सामने खेळणार आहे. येत्या २५ तारखेलाही सामना आहे. कसोटी सामन्यापूर्वी दोन सराव सामने खेळणार असून त्याचा मुख्य मालिकेपूर्वी खूप फायदा होईल.
सराव केल्यानंतर तुम्ही मनोबल वाढविण्यासाठी काय करता?
- हे प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वत:ला कशाप्रकारे पुढच्या आव्हानासाठी सज्ज करता हे महत्त्वाचे ठरते. बºयाचदा तुम्ही संघासोबत असता; पण प्रत्येक वेळी संघासोबत असताच असेही नाही. जेव्हा एकटे असता तेव्हा एक व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्ही स्वत:ला कसे प्रोत्साहित करता हेही महत्त्वाचे असते. प्रत्येकी दिवशी तुम्हाला काही ना काही शिकायला मिळते आणि त्यातून तुम्ही प्रेरणा घेता.
सध्या संघात स्थान मिळविण्यासाठी खूप स्पर्धा आहे. त्याचा काही दबाव जाणवतो का?
- नाही. मी कधीच दबाव घेत नाही. ज्या गोष्टी माझ्या हातात आहेत त्याच मी करतो. स्वत:वर विश्वास ठेवणं महत्त्वाचे आहे. मला माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी त्याचा विचार करून स्वत:ची शक्ती वाया घालवत नाही. त्यापेक्षा मी तयारीवर भर देणे पसंत करतो.
तू कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहेस...अजूनही याचा सराव करतोस?
- सध्या सराव करत नाही; पण काही काही मूव्हस् मला माहिती आहेत. जेव्हा घरी असतो तेव्हा कराटे आणि बॉक्सिंग खेळत असतो. फिटनेससाठी ते महत्त्वाचे ठरते. याशिवाय, मला वाचायला खूप आवडतं. त्याचबरोबर संगीतही आवडतं. मानसिक प्रसन्नतेसाठी या गोष्टी फायदेशीर ठरतात.
रिझल्टच्या पाठीमागे धावू नका
प्रत्येक वेळी तुम्ही यशस्वी होता असे नाही. खेळात अॅटिट्यूड असणे महत्त्वाचे आहे. जे आपल्या हातात आहे. तेच आपण करू शकतो. प्रत्येक वेळी रिझल्ट आणि यशाच्या पाठीमागे धावू नये. ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्यातून आपल्याला काय हवं आणि इतरांना काय देऊ शकतो, ते पाहावे.
- अजिंक्य रहाणे
Web Title: The series wishes to contribute in victory!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.