Rohit Sharma, IND vs BAN 3rd ODI: भारताला धक्का! रोहित वनडे मालिकेतून बाहेर, 'स्पेशल' खेळाडूचा संघात समावेश

रोहित बरोबर आणखी २ खेळाडूही दुखापतग्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 12:56 PM2022-12-09T12:56:47+5:302022-12-09T12:57:37+5:30

whatsapp join usJoin us
Setback for Team India as Rohit Sharma out of Ind vs Ban 3rd ODI Kuldeep Yadav included in Squad | Rohit Sharma, IND vs BAN 3rd ODI: भारताला धक्का! रोहित वनडे मालिकेतून बाहेर, 'स्पेशल' खेळाडूचा संघात समावेश

Rohit Sharma, IND vs BAN 3rd ODI: भारताला धक्का! रोहित वनडे मालिकेतून बाहेर, 'स्पेशल' खेळाडूचा संघात समावेश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma, IND vs BAN 3rd ODI:  भारताचा कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुसऱ्याच षटकात अंगठ्याला जबर मार लागला. त्यानंतरही तो संघाला गरज असल्यामुळे फलंदाजीला उतरला होता. पण त्याच्या अंगठ्याची दुखापत गंभीर असल्याचे BCCIच्या वैद्यकीय पथकाने सांगितले आहे. त्याच्या दुखापतीची तपासणी करण्यात आली असून ढाका येथील स्थानिक रुग्णालयात त्याचे स्कॅनिंगही करण्यात आले. त्यामुळे आता तज्ञांच्या सल्ल्यासाठी तो मुंबईला रवाना झाला असून तो अंतिम वनडे खेळू शकणार नाही. त्याशिवाय, भारताला आणखी मोठा धक्का म्हणजे, आगामी कसोटी मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून त्याबद्दल नंतर निर्णय घेतला जाईल, असे BCCIने स्पष्ट केले आहे.

रोहितसह आणखी दोघांना दुखापत!

वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने पहिल्या वनडे सामन्यानंतर पाठीच्या दुखापतीची तक्रार केली होती. BCCIच्या वैद्यकीय पथकाने त्याचे मूल्यांकन केले आणि त्याला दुसऱ्या वनडेपासून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. कुलदीपला तणावग्रस्त दुखापतीचे निदान झाले असून तो मालिकेतून बाहेर पडला. सहकारी वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान डाव्या हाताच्या दुखापतीचा त्रास पुन्हा नव्याने सुरू झाला आणि तोही मालिकेतून बाहेर पडला. कुलदीप आणि दीपक दोघेही आता त्यांच्या दुखापतींच्या पुढील व्यवस्थापनासाठी NCAकडे अहवाल देतील.

दरम्यान, अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने कुलदीप यादवचा तिसऱ्या आणि अंतिम वनडेसाठी भारतीय संघात समावेश केला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ: केएल राहुल (कर्णधार व विकेटकिपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव

Web Title: Setback for Team India as Rohit Sharma out of Ind vs Ban 3rd ODI Kuldeep Yadav included in Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.