विश्वचषकात रेफ्री पॅनलमध्ये सात महिला

भारतात ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षे गटाच्या फीफा फुटबॉल विश्वचषकासाठी रेफ्रींच्या पॅनलमध्ये सात महिला सहयोगी रेफ्रीची भूमिका बजावणार आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:54 AM2017-08-19T00:54:59+5:302017-08-19T00:55:01+5:30

whatsapp join usJoin us
Seven women in the referee panel in World Cup | विश्वचषकात रेफ्री पॅनलमध्ये सात महिला

विश्वचषकात रेफ्री पॅनलमध्ये सात महिला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतात ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षे गटाच्या फीफा फुटबॉल विश्वचषकासाठी रेफ्रींच्या पॅनलमध्ये सात महिला सहयोगी रेफ्रीची भूमिका बजावणार आहेत.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे स्पर्धा आयोजन समितीने म्हटले असून पुरुषांच्या स्पर्धेसाठी फीफाने प्रथमच महिला रेफ्रींची नियुक्ती केली आहे. पूर्वतयारी, सुधारणा आणि निकाल या गोष्टी ध्यानात ठेवून महिला रेफ्रींना पुरुषांच्या स्पर्धेत पुरुष रेफ्रींच्या खांद्याला खांदा लावून काम करू देण्याची संधी निर्माण करण्याची हीच खरी वेळ असल्याचे फीफाला वाटते.
फीफाच्या मॅच रेफ्री समितीत सर्व सहा परिसंघांचे प्रतिनिधित्व असलेले २१ त्रिकुटांचे पथक कार्यरत राहील. १७ वर्षे गटाच्या स्पर्धेचे आयोजन २८ आॅक्टोबरपर्यंत गोवा, गुवाहाटी, कोची, कोलकाता, नवी मुंबई आणि नवी दिल्लीत होणार आहे. फायनल २८ आॅक्टोबर रोजी कोलकाता येथे विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर होणार आहे. (वृत्तसंस्था)

सहयोगी महिला रेफ्री: ओके रि हयांग (कोरिया), ग्लॅडिस लेंगवे (झाम्बिया), कॅरल अ‍ॅने चेनार्ड (कॅनडा), क्लॉडिया अंपिरेज (उरुग्वे), अ‍ॅन्ना-मारी केघले (न्यूझीलंड), कॅटरिना मोनझूल (युक्रेन), ईस्थर स्टॉबली (स्वित्झर्लंड).

Web Title: Seven women in the referee panel in World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.