डब्लीन : न्युझीलंड महिला क्रिकेट संघाची १७ वर्षांची सलामीवीर अमेलिया केर हिने आज येथे आर्यलंड विरोधातील मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात २३२ धावांची नाबाद खेळी करत २१ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. एकदिवसीय सामन्यातील हे तीचे पहिलेच शतक आहे. तिने आपल्या पहिल्याच शतकाला द्विशतकात परिवर्तित करण्याचा पराक्रम देखील केला.
या आधी सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आॅस्ट्रेलियाची माजी कर्णधार बेलिंडा क्लार्क हिने मुंबईत डेन्मार्क विरोधात २२९ धावा केल्या होत्या. हा विक्रम आज अमेलिया केरच्या खेळीने मोडला. न्युझीलंडचा महिला संघ सध्या आर्यलंड आणि इंग्लंडच्या दौºयावर आहे. मालिकेतील तिसºया सामन्यात सलामीवीर अमेरिया केर हिने १४५ चेंडूंच्या आपल्या खेळीत ३१ चौकार आणि दोन षटकार लगावत २३२ धावा केल्या.
अमेलिया हिने २०१६ मध्ये पाकिस्तान विरोधात पर्दापण केले होते. आतापर्यंत तिची सर्वोच्च धावसंख्या ८१ होती. तीने १९ एकदिवसीय सामन्यात ३१ विकेट्स देखील मिळवल्या आहेत. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत बेलिंडा क्लार्क आणि अमेलिया मेर यांनाच द्विशतक करता आले आहे.
Web Title: In the seventeenth year, she made a double century, broken record 21 years old
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.