मॅन्चेस्टर : सलामीवीर शान मसूदच्या शानदार नाबाद शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ५ बाद २०० अशी वाटचाल केली. ३० वर्षांच्या डावखुºया मसूदने २५१ चेंडूंचा सामना करीत १३ चौकारांसह चौथे कसोटी शतक नोंदवले. पाकने ८६ षटकात ५ बाद २४४ अशी वाटचाल केली असून शादाब खान ३४ धावांवर खेळत आहे.
नाणेफेक जिंकणाºया पाकने पहिल्या दिवशी पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात येईपर्यंत ४९ षटकात २ बाद १३९ धावा केल्या होत्या. काल ६९ धावांवर नाबाद असलेला बाबर आझम त्याच धावसंख्येवर जेम्स अॅन्डरसनचा बळी ठरला. स्टुअर्ट ब्रॉडने असद शफीक याला बेन स्टोक्सकडे झेल देण्यास बाध्य करीत १५० धावांवर चौथा धक्का दिला. वेगवान ख्रिस वोक्सने मोहम्मद रिझवानला बाद केले. उपहारापर्यंत ५ बाद १८७ अशी स्थिती होती. शान मसूद ७७ धावांवर नाबाद होता. उपाहारानंतर शादाब खान (नाबाद ३४) याच्या सोबतीने मसूदने इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. दोघांनी धावसंख्येला आकार दिला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकपाकिस्तान पहिला डाव : ८६ षटकात ५ बाद २४४ (शान मसूूद खेळत आहे १००,बाबर आझम ६९, शादाब खान खेळत आहे ३४)गोलंदाजी : ख्रिस वोक्स २/२८,अॅन्डरसन १/५६, स्टुअर्ट ब्रॉड १/४७,जोफ्रा आर्चर १/३९.