Shabnim Ismail fastest ball: महिला प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात मुंबईच्या शिलेदारानं भीमपराक्रम केला. महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू या सामन्यात पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या शबनम इस्माइल हिने वेगवान चेंडू टाकून ऐतिहासिक कामगिरी केली. या सामम्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली.
मुंबई इंडियन्सकडून तिसरे षटक इस्माइल टाकत होती. तिने दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगला महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांनाच धक्का दिला. खरं तर शबमनमे १३२.१ किमी प्रति ताशी वेगाने चेंडू टाकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम शबनमच्या नावावर आहे. तिने वेस्ट इंडिजविरूद्ध २०१६ मध्ये १२६ प्रति किमी ताशी वेगाने गोलंदाजी केली होती.
सर्वात वेगवान चेंडू!दरम्यान, वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला असला तरी या सामन्यात शबमनला साजेशी कामगिरी करता आली नाही. तिने आपल्या ४ षटकांत ४६ धावा दिल्या आणि १ बळी घेतला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत १९२ धावांचा डोंगर उभारला. १९३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला घाम फुटला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सचा संघ ८ बाद केवळ १६३ धावा करू शकला. अशापद्धतीने दिल्लीने आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवत पाहुण्या संघाला पराभवाची धूळ चारली. दिल्लीकडून जेमिमा रॉड्रिग्जने मॅचविनिंग खेळी केली. तिने ३३ चेंडूत ६९ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.