पंजाब किंग्जचा फलंदाज शाहरुख खानने लखनऊविरुद्धच्या सामन्यात १० चेंडूत २३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. शाहरुखने अखेरच्या षटकात ८ धावांची गरज असताना संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. या खेळीत शाहरुखने २ षटकार आणि १ चौकार लगावले. पंजाबचा अष्टपैलू खेळाडू सिंकदर रझाने देखील अर्धशतक झळकावत संघाला मजबूत स्थितीत आणले. त्यानंतर शाहरुख खानने अखेरच्या षटाकांत धावा करत पंजाबला विजय मिळवून दिला.
सामना संपल्यानंतर सिकंदर रझाने शाहरुख खानशी चर्चा केली आणि किंग खान शाहरुख खानच्या नावावरून त्याचे नाव कसे ठेवले हे देखील विचारले, ज्यावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिले. 'शाहरुखचा जन्म १९९५मध्ये झाला. त्याआधी १९९३ मध्ये 'बाजीगर' चित्रपट आला होता. त्यावेळी, शाहरुख खानच्या चाहत्यांनी माझ्या आईला माझ्या जन्मानंतर 'शाहरुख' नाव ठेवण्यास सांगितले, त्यामुळे माझे नाव 'शाहरुख खान' असे ठेवण्यात आले, असं पंजाबचा फलंदाज शाहरुख खानने सांगितले.
पंजाब किंग्सची चौथ्या स्थानावर उडी; राजस्थान अजूनही अव्वल स्थानी कायम, पाहा Points Table
दरम्यान, सिकंदर रझाचे शानदार अर्धशतक आणि शाहरुख खानने तळाच्या फलंदाजांच्या साथीत चमकदार कामगिरी करताना आयपीएलमध्ये पंजाब किंग्जला लखनौ सुपरजायंट संघाविरुद्ध दोन गडी राखून विजय मिळवून दिला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपरजायंटस्ने २० षटकांत ८ बाद १५९ धावा केल्या. पंजाबने १९.३ षटकांत आठ बाद १६१ धावा करत विजय साकारला
ऑरेंज कॅप
शिखर धवन ४ सामने खेळून २३३ धावा करून पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे ज्याने ५ कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे, कोहलीने ४ सामन्यात एकूण २१४ धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत ३ अर्धशतके ठोकली आहेत. याशिवाय राजस्थानचा जोस बटलर चौथ्या क्रमांकावर आहे. बटलरने आतापर्यंत ४ सामन्यात २०४ धावा नोंदवल्या आहेत. यानंतर नंबर येतो. ऋतुराज गायकवाड, ज्याने आतापर्यंत ४ सामन्यात १९७ धावा केल्या आहेत. तो ५व्या क्रमांकावर आहे.
पर्पल कॅप
मार्क वूडने ४ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा युजवेंद्र चहल आहे. चहलने आतापर्यंत ४ सामन्यात १० विकेट्स घेत पर्पल कॅपचा ताबा घेतला आहे. रशीद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे, राशिनने ४ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर रवी बिश्नोई आहे ज्याने ५ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप सिंगही पाचव्या क्रमांकावर आहे. अर्शदीपने ५ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत.