Join us  

Corona Virus : Shah Rukh Khanचा संघ करतोय परदेशात गरजूंना मदत 

कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यानं महाराष्ट्र राज्य सरकारला मदत केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 11:21 AM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यानं महाराष्ट्र राज्य सरकारला मदत केली. शिवाय या काळात गरजूंनातीह किंग खान मदत करत आहे. पण, त्याची ही मदत केवळ भारतापूरती मर्यादित नाही, तर त्यानं परदेशातील गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा तो सहमालक आहे आणि या संघानं शुक्रवारी त्रिनिदाद अँड टोबॅगो येथील 1000 गरजूंना धान्याचं वाटप केलं. नाइट रायडर्स संघातील किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स आणि सुनील नरीन यांनी हे वाटप केलं. कोरोना व्हायरसमुळे त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे. शाहरुखनं संघाच्या या समाजसेवेचं कौतुक केलं आहे.

''त्रिनबागो नाइट रायडर्सनं HADCO Ltd. सोबत सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. त्यातून त्यांनी शुक्रवारी 1000 गरजूंना धान्याचं वाटप केले. माझ्या संघाचा मला अभिमान वाटतो,'' असे शाहरुखनं ट्विट केलं. ''कोरोनामुळे आलेल्या संकटाची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि अशा गरजूंना मदत करण्याची इच्छा त्रिनबागो नाइट रायडर्सची आहे,'' असे संघाचे संचालक वेंकी मैसोर यांनी सांगितले.   

लॉकडाऊनने काय केली MS Dhoni ची अवस्था; ओळखणंही झालं अवघड!

अनुष्कासोबत लग्न होण्यापूर्वी Virat Kohli होता ब्राझीलियन मॉडलचा प्रेमात!

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याशाहरुख खान