पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi) यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या आफ्रिदीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात १०० विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला. त्यानं जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याचा विक्रम मोडला. बुमराहनं यापूर्वी २३ वर्ष व ५७ दिवसांचा असताना ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. आफ्रिदीनं २० वर्ष व ३२६ दिवसांचा असताना ट्वेंटी-20त १०० विकेट्स घेतल्या. टर्निंग खेळपट्टीवर फलंदाजांनी 'रबर सोल'चे शूज घालावेत; मोहम्मद अझरुद्दीनचा अजब गजब सल्ला
आफ्रिदीनं पाकिस्तान सुपर लीगच्या सातव्या सामन्यात ही पराक्रम केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात १०० विकेट्सचा विक्रम तसा अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमान याच्या नावावर आहे. त्यानं १८ वर्ष व २७१ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. पण, आफ्रिदी हा सर्वात सर्वात युवा जलदगती गोलंदाज ठरला. त्यांच्या व्यतिरिक्त राशिद खाननं १८ वर्ष व ३६० दिवसांचा असताना ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण केले होते. पाकिस्तानच्या शादाब खान यानंही २० वर्ष व १४८ दिवसांचा असताना आणि इंग्लंडच्या डॅनी ब्रिग्स यानं २३ वर्ष व ५६ दिवसांचा असताना हा पराक्रम केला.