सध्या भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. यजमान भारत आणि न्यूझीलंड सलगच्या विजयांमुळे क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडने विजयाचा चौकार तर भारताने पाकिस्तानला पराभूत विजयाची हॅटट्रिक लगावली. भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव झाल्यानंतर शेजारी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहेत. तर आज पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनूसला यंदाच्या विश्वचषकातील 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट'चा अवॉर्ड कोण जिंकणार असा प्रश्न केला असता त्याने दोन भारतीय दिग्गजांची नावे घेतली.
वन क्रिकेटशी बोलताना वकार युनूसने म्हटले, "यंदाच्या विश्वचषकात अनेक बाबी अनपेक्षित घडत आहेत. पण, मला वाटते की शाहीन आफ्रिदी आणि बाबर आझम हे दोघे पाकिस्तानी संघाचे महत्त्वाचे भाग आहेत. माझ्या मते, त्यांना अद्याप तरी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा चांगल्या लयमध्ये आहे, जसप्रीत बुमराहने देखील दुखापतीनंतर जोरगदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे हे दोघेच यंदाच्या 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट'चे मानकरी ठरतील असे मला वाटते.
बुमराहचे कौतुकतसेच जसप्रीत बुमराह चांगली गोलंदाजी करतो आहे. त्याच्यासारखी शाहीन आफ्रिदी देखील गोलंदाजी करू शकतो. पण, आताच्या घडीला बुमराहचा दबदबा आहे. आगामी सामन्यांमध्ये देखील बुमराहचा सुपर शो पाहायला मिळेल अशी आशा आहे, असेही युनूसने नमूद केले.
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
भारताचे पुढील सामने -भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू