वर्ल्ड कपमधील अपयशानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी केली. त्यानंतर कर्णधार बाबर आजमच्या कर्णधारपदावर तलवार चालणार हे निश्चित होतं. त्याआधीच Babar Azam ने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. आता जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी ( Shaheen Afridi ) पाकिस्तानचा वन डे व ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार असेल, शान मसूदकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला ९ पैकी ४ सामने जिंकता आले होते.
बाबरला कसोटी संघांच्या कर्णधारपदी कायम राहण्यास सांगितले होते, परंतु त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या कुटुंबीयांशी व सल्लागारांशी चर्चा केली आणि कर्णधारपद सोडले. पीसीबी त्याच्या निर्णयाचे स्वागत करते, असे पीसीबीने सांगितले.
बाबर काय म्हणाला?
बाबरला वर्ल्ड कपच्या ९ सामन्यांत ४ अर्धशतकांसह ३२० धावा करता आल्या. त्याने लिहिले की, ''२०१९मध्ये पीसीबीकडून मला फोन केला होता आणि तो दिवस आजही माझ्या लक्षात आहे. मागील चार वर्षांत मी खूप चढ उतार पाहिले, परंतु मी नेहमीच संघाच्या हिताचा आणि देशाची मान ताठ ठेवण्याचा प्रयत्न केला. वन डे क्रिकेटमधील नंबर १ हे सर्व सहकाऱ्यांच्या व व्यवस्थापकांच्या योगदानाचे फलित आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांचे मी आभार मानतो, ते नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.''
''आज मी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देतोय. हा निर्णय अवघड होता, परंतु हिच योग्य वेळ असल्याचे मला वाटते. खेळाडू म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व मी करणार आहे. नव्या कर्णधाराला माझा पूर्ण पाठींबा असेल आणि माझा अनुभव संघाच्या हितासाठी कामी आणेन. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मी आभार मानतो,''असेही त्याने लिहिले.
Web Title: Shaheen Afridi appointed as Pakistan's captain in White Ball cricket, Shan Masood will captain in Tests.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.