PAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला शाहिद आफ्रिदीचा जावई, Video Viral 

PAK vs SA : बाबर आजम आणि टीमला ICC वर्ल्ड कप स्पर्धेत सलग चौथा पराभव सहन करता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 04:20 PM2023-10-28T16:20:00+5:302023-10-28T16:20:31+5:30

whatsapp join usJoin us
Shaheen Afridi breaks down, cries inconsolably after Pakistan's painful defeat against South Africa; video viral | PAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला शाहिद आफ्रिदीचा जावई, Video Viral 

PAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला शाहिद आफ्रिदीचा जावई, Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs SA : बाबर आजम आणि टीमला ICC वर्ल्ड कप स्पर्धेत सलग चौथा पराभव सहन करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानने कडवी टक्कर दिली, परंतु एक विकेटने त्यांना हार मानावी लागली. यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी रडताना दिसला. डगआऊटमध्ये बसून त्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


२७२ धावांचे आव्हान असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयापासून २१ धावा दूर होता. त्यानंतर ९१ धावांची खेळी खेळणारा एडन मार्करम आऊट झाला. यानंतर आफ्रिकेच्या उर्वरित विकेटही झटपट पडल्या. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ९ बाद २६० धावा झाल्या होत्या. त्यांना विजयासाठी ११ धावांची गरज असताना केशव महाराजने पाकिस्तानला जिंकू दिले नाही आणि ४७.२ षटकांत दक्षिण आफ्रिकेने ९ गडी गमावत २७१ धावा करून विजय मिळवला. 


आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संघाचे खेळाडू जेव्हा डगआऊटमध्ये गेले. शाहीन आफ्रिदी तिथे रडताना दिसला आणि त्याच्या शेजारी बसलेला दुसरा सदस्य शाहीनला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसला. पण शाहीनला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहीनने १० षटकांत ४५ धावा देत ३ बळी घेतले, पण ते विजयासाठी पुरेसे नव्हते. 

Web Title: Shaheen Afridi breaks down, cries inconsolably after Pakistan's painful defeat against South Africa; video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.