Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात १० सप्टेंबरला होणाऱ्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. साखळी फेरीत भारत-पाकिस्तान यांच्यातली लढत पावसामुळे रद्द झाली होती. पण, शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा व विराट कोहली यांची दांडी गुल झाली होती. टीम इंडियाचा कर्णधार रोहितच्या मनात शाहीन आफ्रिदीची भीती बसली आहे आणि याच कारणामुळे तो संघर्ष करताना दिसतो, असा दावा पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने ( Shoaib Akhtar) केला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबरला सामना झाला होता. ज्यामध्ये पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने कर्णधार रोहितला स्वस्तात क्लीन बोल्ड केले. यानंतर विराटलाही क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शोएब अख्तरने स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेत रोहितची फलंदाजी शाहीनसमोर सातत्याने अपयशी ठरत असल्याबद्दल सांगितले की, ''तो पूर्वीसारखा रोहित शर्मा नाही. हा त्याचा स्टंट डबल आहे. शाहीनची भीती मनात बसली आहे. रोहितला त्याचा स्टान्स बदलताना मी कधीच पाहिले नाही. पण आता त्याचा स्टान्स बदलला आहे. रोहितच्या मनात आता भीती बसली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अनेकदा खेळाडूंसोबत असे प्रकार घडले आहेत.''
पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने ४ फलंदाज ६६ धावांत गमावले होते. यानंतर युवा फलंदाज इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम खेळताना २६६ धावा केल्या. पण त्यानंतर पाऊस पडला आणि सामना रद्द घोषित करण्यात आला.
Web Title: Shaheen Afridi has made Rohit Sharma way into his mind. I have never seen Rohit change his stance; Shoaib Akhtar rips into Indian captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.