Join us  

Shaheen Afridi Wedding: शाहिद आफ्रिदीचा जावई किती कमावतो माहित्येय? भारताच्या रणजीपटूला त्यापेक्षा अधिक पगार मिळतो

Shaheen Afridi Wedding: पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 6:06 PM

Open in App

Shaheen Afridi Wedding: पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या मुलीसोबत त्याचा आज विवाह होणार आहे. आफ्रिदीचा जावई म्हणजे ठिकठाक कमावणारा असेलच, यात शंकाच नाही. चला तर मग शाहीन आफ्रिदीची नेट वर्थ किती प्रॉपर्टी आहे, हे जाणून घेऊया... 

शाहिद आफ्रिदीने मामे बहिणीसोबत केलंय लग्न, पाच मुलींचा आहे बाप; जाणून घ्या त्याच्या पत्नीचं प्रोफेशन

शाहीन आफ्रिदीची एकूण संपत्ती भारतीय रुपयांमध्ये सुमारे ५५ कोटी रुपये आहे. त्याची वार्षिक कमाई १२ कोटी रुपये आहे, तर त्याची मासिक कमाई ५० लाख ते एक कोटी रुपये आहे. २०२३ मध्ये शाहीन आफ्रिदीची एकूण संपत्ती $7 दशलक्ष आहे, जी भारतीय रुपयात अंदाजे ५५ कोटी रुपये आहे. शाहीन आफ्रिदी पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील लेंडी कोटल येथे आपल्या कुटुंबासह आलिशान घरात राहतो. याशिवाय या गोलंदाजाची पाकिस्तानात आणखी बरीच घरे आहेत.

शाहीन आफ्रिदीची ब्रँड एंडोर्समेंट फी १० ते २० लाख रुपये आहे.  त्याच्याकडे ऑडी A8 हायब्रिड    ( १.३ कोटी), टोयोटा रेवो हिलक्स ( ३५ लाख +), टोयोटा लँड क्रूझर    ( १.५ कोटी ) व होंडा सिविक ( २० लाख ) या गाड्या आहेत.    

  • शाहीन आफ्रिदी पत्नीचे नाव: अंशा आफ्रिदी
  • शाहीन आफ्रिदीचे वय किती आहे: २२
  • अंशा आफ्रिदीचे वय किती आहे: २३
  • शाहीन आफ्रिदीचे लग्न कधी झाले: ३ फेब्रुवारी २०२३

शाहीन आफ्रिदीने ३ फेब्रुवारीला कराचीमध्ये अंशा आफ्रिदीसोबत लग्न केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह अनेक खेळाडू लग्नाला पोहोचले होते. शाहीन सध्या पाकिस्तानकडून खेळतो, तो संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. तो पाकिस्तानकडून २५ कसोटी, ३२ वन डे आणि ४७ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे ९९, ६२ आणि ६८ विकेट घेतल्या आहेत.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तान
Open in App