नवी दिल्ली : अलीकडेच पार पडलेल्या कसोटी मालिकेत इंग्लिश संघाने पाकिस्तानला त्यांच्याच धरतीवर 3-0ने पराभूत केले. आता न्यूझीलंडचा संघ देखील शेजाऱ्यांना त्यांच्याच धरतीवर मात देण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, इंग्लंडविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीची निवड केली. आफ्रिदीने न्यूझीलंडविरूद्धच्या 2 सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानी संघ जाहीर केला आहे.
दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका सोमवारपासून सुरू होणार आहे. आगामी मालिकेसाठी आफ्रिदीने संघात नवख्या खेळाडूंना स्थान दिले आहे. संघ जाहीर केल्यानंतर त्याने म्हटले, "आम्ही संघावर चांगली चर्चा केली आणि एकमत झाले की सामन्यात 20 बळी घेण्याची सर्वोत्तम संधी देण्यासाठी आम्हाला आमचा गोलंदाजी विभाग मजबूत करणे आवश्यक आहे. अलीकडील फॉर्म आणि कामगिरी लक्षात घेऊन आम्ही वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. संघात मीर हमजा आणि शाहनवाज दहानी आणि ऑफस्पिनर साजिद खान यांना संधी मिळाली आहे."
इंग्लंडविरूद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव
इंग्लंडविरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला आपल्या घरातच दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत पाकिस्तानी गोलंदाजांची कमजोर बाजू जगासमोर आली होती. तसेच या मालिकेत यजमानांना 0-3ने पराभव पत्करावा लागला होता. मालिकेतील दारूण पराभवानंतर पाकिस्तानी संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत खूप मागे फेकला गेला.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, अबरार अहमद, हसन अली, इमाम उल हक, कामरान गुलाम, मीर हमजा, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, नोमान अली, साजिद खान, सलमान अली आगा, सरफराज अहमद, सऊद शकील, शाहनवाज दहानी, शान मसूद आणि जाहिद महमूद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Shahid Afridi, after becoming the chairman of the Pakistan cricket selection committee, gave a chance to new players in Babar Azam's squad for the series against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.