शाहिद आणि शाहीन, ‘सासरे-जावई’ जोरदार चर्चेत!

त्याचं एक कारण म्हणजे पाकिस्तान हरला त्या सामन्यात शेवटची ओव्हर टाकली तीच त्याच्या होणाऱ्या जावयाने. शाहीन आफ्रिदीने. तसा तो गुणी बॉलर. मात्र त्यानं त्या षटकात २२ धावा देत सामना हातचा घालवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 05:56 AM2021-11-16T05:56:43+5:302021-11-16T06:04:14+5:30

whatsapp join usJoin us
Shahid afridi and Shaheen afridi - 'Sasare-Jawai' in discussion! | शाहिद आणि शाहीन, ‘सासरे-जावई’ जोरदार चर्चेत!

शाहिद आणि शाहीन, ‘सासरे-जावई’ जोरदार चर्चेत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआफ्रिदीला पाच लेकी आहेत. मुलगा हवा म्हणून पाच-पाच मुली होऊ दिल्या, अशी टीका तर त्याच्यावर कायम होते.

टी ट्वेंटी वर्ल्ड कप संपला, सुपर फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तान संघाच्या वाट्याला अपयश आले. अपयशाला जबाबदार कोण म्हणत बरीच चर्चा सुरू असली तरी या साऱ्या चर्चेत एक माणूस जास्त टीकेचा धनी झाला. त्याचं नाव म्हणजे शाहिद आफ्रिदी. (शाहीन आफ्रिदीचा भावी सासरा) तसंही हे नाव कायम वादग्रस्तच. त्यात त्याच्या वयावरून कायमच वाद. त्याचं वय नेमकं किती यावरून आजही वेगवेगळे आकडे सांगितले जातात. मात्र पाकिस्तानचा संघ विश्वचषकात उत्तम खेळत होता आणि पुढे हरला तेव्हाही पाकिस्तान समाजमाध्यमात अनेकांनी शाहिद आफ्रिदीवर टीका केली.

त्याचं एक कारण म्हणजे पाकिस्तान हरला त्या सामन्यात शेवटची ओव्हर टाकली तीच त्याच्या होणाऱ्या जावयाने. शाहीन आफ्रिदीने. तसा तो गुणी बॉलर. मात्र त्यानं त्या षटकात २२ धावा देत सामना हातचा घालवला. ते कमीच म्हणून हसन अलीने कॅच सोडली, हसनची बायको भारतीय म्हणून त्याच्यावर टीका होत असताना आता आफ्रिदीच्या जावयाकडे बोट दाखवणं सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे चर्चेत आलं ते शाहिद आफ्रिदीचं नाव. तसंही त्यानं आपल्या मुलींवर घातलेली बंधनं, त्यांच्यासाठीचे नियम, त्यांच्या खेळण्याला असलेली मनाई या साऱ्यांमुळे पाकिस्तानी समाजमाध्यमात, पुरोगामी वर्तुळात त्याच्यावर कायम टीका होतेच. त्यातच अलीकडे शाहिद आफ्रिदीने एक भाषण केलं.  बख्तावर गर्ल्स कॅडेट कॉलेजमध्ये आफ्रिदी विद्यार्थिनींशी बोलत होता. त्यावेळी तो म्हणाला, “तुमच्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करा, समाजमाध्यमं आणि मोबाईल ही वेळ वाया घालवणारी माध्यमं आहेत.” यात त्याच्यावर टीका व्हावी असं काही नव्हतं, मात्र एरव्हीही त्याचे मुलींच्या संदर्भातले बुरसटलेले विचार पाहता आफ्रिदी फार ट्रोल झाला.

त्यासंदर्भातली एक पोस्ट फार गाजली आणि अनेकांनी ते मत म्हणून उचलून धरलं. ती पोस्ट म्हणते,  ‘खबरदार, होशियार! आमच्या महान पश्तून कुटुंबातल्या माझ्या मुलींना आम्ही अजिबात कुठलाही खेळ खेळण्याची परवानगी देत नाही. त्या टीव्हीवर येत नाहीत, सोशल मीडिया वापरत नाहीत. १८-१९ वर्षांच्या होत नाही तोच आम्ही त्यांची लग्न लावून टाकतो. मात्र एका गोष्टीची त्यांना आम्ही परवानगी देतो, त्यांना श्वास घेण्याची परवानगी आहे.’
आपल्या मर्जीशिवाय मुलींनी श्वासही घेऊ नये, त्यांना जगण्याचाही हक्क नाही, असं आफ्रिदीसारख्या जग पाहिलेल्या माणसाला का वाटावं? का तो इतका बुरसटलेला आणि मुलींना पिंजऱ्यात कोंडून घालणारा, याविषयी पाकिस्तानी समाजमाध्यमांनी बरीच चर्चा केली. अक्सा ही त्याची मोठी लेक. जेमतेम वीस वर्षांची. तिचं लग्न शाहीन आफ्रिदी या तेज गोलंदाजाशी ठरवलं, तेही आफ्रिदी कुटुंबाने मिळूनच.

आफ्रिदीला पाच लेकी आहेत. मुलगा हवा म्हणून पाच-पाच मुली होऊ दिल्या, अशी टीका तर त्याच्यावर कायम होते. त्यानेही अलीकडेच एका मुलाखतीत मान्य केलं की, पाकिस्तानात मुलगाच हवा म्हणून महिलांवर फार प्रेशर असतं आणि जे चुकीचं आहे.’ मात्र असं म्हणत असताना स्वत:च्या लेकींच्या संदर्भात तो अत्यंत जुनाट विचारांचा आहे. आपल्या मुलींना क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही, कुठलाच मैदानी खेळ खेळण्याची परवानगी नाही. त्यांनी इनडाेअर गेम वाटल्यास खेळावे हे त्याच्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रातले विधान. त्यानंही बराच वादंग झाला होता. मात्र तरीही तो आपल्या मतावर ठाम होता.

बरीच टीका झाली त्यावर, तेव्हा तो म्हणालाही जाहीरपणे की, ‘फेमिनिस्टसना जे म्हणायचं ते म्हणू देत, पाकिस्तानी जुन्या विचारांचा बाप म्हणून मी माझ्यापुरता निर्णय घेतलेला आहे.’ २०१९ ची ही गोष्ट. तेव्हापासून अगदी अलीकडच्या विश्वचषक सामन्यांंपर्यंत आफ्रिदीवर टीका होतेच आहे. पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी अलीकडेच एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यात आफ्रिदी म्हणतो की, यावेळी तालिबान पॉझिटिव्ह माइण्डसेटने सत्तेत परतले आहेत, ते बायकांना काम करू देतील आणि त्यांना क्रिकेटही आवडतं असं मला वाटतं.. त्या व्हिडिओवरही टीका झाली. बायकांनी काम करायचं की नाही, शिकायचं की नाही, जगायचं की नाही, कसं जगायचं हे सगळे अधिकार ‘पुरुषांना’ दिले कुणी, असं अनेकांनी शाहिद आफ्रिदीला जाहीरपणे विचारलं.

अर्थात हे सारे प्रश्नच. आफ्रिदी त्याच्या विचारांनुसारच जगतो आहे, त्याला पाठिंबा देणारेही आहेतच, जे म्हणतातच की, मुलींनी ‘मर्यादेत’च राहायला हवं. मात्र या विश्वचषकात जेव्हा जिंकण्या-हरण्याच्या चर्चा रंगल्या तेव्हा हा विषयदेखील पाकिस्तानी समाजमाध्यमी तरुणांनी चर्चेत ठेवला हेही वेगळेच म्हणायचे.

जावई माझा भला
सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिक आणि ज्यानं कॅच सोडली ताे हसन अली हे दोघेही भारताचे जावई. कधी टीकेचे धनी ठरले तर कधी कौतुकाचे. शाहीन आफ्रिदी या शाहिद आफ्रिदीच्या होणाऱ्या जावयाचे मात्र जगभर कौतुक झाले. त्याची बॉलिंग आणि हसू यांचे दिवाने जगभर. अर्थात एका ओव्हरने त्याच्या लोकप्रियतेला गालबोट लागलेच.

Web Title: Shahid afridi and Shaheen afridi - 'Sasare-Jawai' in discussion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.