Join us  

मुलीला आरती करताना पाहून शाहिद आफ्रिदीने चक्क टीव्हीच फोडला; हिंदू धर्माची उडवली थट्टा...

हा सारा प्रकार सांगत असताना आफ्रिदीने हिंदू धर्माची थट्टा उडवल्याचेही चाहत्यांना समजले आहे. त्यामुळे आता आफ्रिदीवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 2:49 PM

Open in App
ठळक मुद्देया व्हिडीओमध्ये हा सारा प्रकार आफ्रिदी सांगत असल्याचे आपण पाहू शकतो.

मुंबई : पाकिस्तानमध्येहिंदू क्रिकेटपटूंवर अन्याय केला जातो, ही गोष्ट आपण काही दिवसांपूर्वीच वाचली. आता तर पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने हिंदू धर्माबद्दल चीड आणणारी एक गोष्ट समोर आणली आहे.

हिंदू धर्मामध्ये देवांची आरती केली जाते, अशीच आरती एकदा आफ्रिदीची मुलगीही टीव्हीसमोर करत होती. ही गोष्ट घरात आल्यावर आफ्रिदीने पाहिली. पहिल्यांदा आफ्रिदीला कळत नव्हते, की नेमकं चाललंय तरी काय. पण थोड्यावेळातच आपली मुलगी टीव्हीसमोर आरती करत असल्याचे त्याला समजले. त्यानंतर आफ्रिदी चांगलाच भडकला. त्यावेळी आफ्रिदी थेट टीव्हीच फोडून टाकला. ही गोष्ट दस्तुरखुद्द आफ्रिदीनेच एका टीव्ही शोमध्ये सांगितली होती. आफ्रिदीचा हा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झालेला आहे.

या व्हिडीओमध्ये हा सारा प्रकार आफ्रिदी सांगत असल्याचे आपण पाहू शकतो. त्याचबरोबर हा सारा प्रकार सांगत असताना आफ्रिदीने हिंदू धर्माची थट्टा उडवल्याचेही चाहत्यांना समजले आहे. त्यामुळे आता आफ्रिदीवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

या व्हिडीओमध्ये आफ्रिदी म्हणाला की, " आमच्या घरामध्ये भारतातील वाहिनी पाहिली जाते. या वाहिनीवरचे कार्यक्रम माझ्या बायकोला आवडतात. मी बायकोला यापूर्वीही बोललो होतो, की एकटी असताना टीव्ही पाहत जा. मुलांपुढे टीव्ही पाहत जाऊ नको. मी एकदा घरी आलो तेव्हा, माझी मुलगी टीव्ही समोर हिंदू धर्मामध्ये जे करतात ते करत होती. एक थाळी घेऊन ती गोल गोल फिरवत होती. त्यावेळी मला राग आला आणि मी टीव्हीच फोडून टाकला."

टॅग्स :शाहिद अफ्रिदीहिंदूपाकिस्तान