Asia Cup 2022, India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की एक वेगळाच रोमांच अनुभवण्याची संधी असते. पारंपारिक प्रतिस्पर्धी जेव्हा मैदानात भिडतात तेव्हा सर्वांचं दोन्ही संघाच्या खेळाडूंकडेही आवर्जून लक्ष असतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल दुबईत ट्वेन्टी-२० सामना रंगला. भारतीय संघानं पाकिस्तानवर पाच विकेट्सनं मात केली. मैदानात यावेळी अतिशय मैत्रिपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी हसतखेळत वावरताना दिसले. एकमेकांशी गप्पा मारताना दिसले.
परिस्थिती काही असो, आम्ही एकदम OK!; Rohit Sharmaने सांगितला भारताच्या विजयाचा मंत्र
एकवेळ अशी होती होती भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की दोन्ही संघातील खेळाडूंमध्येही भर मैदानात बाचीबाची होताना आपण पाहिली आहे. त्यात शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यातील द्वंद्व तर ठरलेलंच. २००७ साली कानपूरमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात दोघंही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर मोठा गहजब उडाला होता. पण मैदानाबाहेर गेल्यानंतर आम्ही मैदानात घडलेल्या गोष्टी बाजूला सारतो असं दोघंही त्या घटनेनंतर म्हणाले होते. क्रिकेट चाहते मात्र ती घटना कधीच विसरू शकत नाहीत. इतकंच काय दोघंही निवृत्त झाल्यानंतर ट्विटरवर एकमेकांवर शेलक्या शब्दांत टिका करू लागले.
हा माझा Ego नाही, तर आत्मविश्वास आहे! पाकिस्तानची धुलाई केल्यानंतर Hardik Pandya असं का म्हणाला?
गेल्या काही वर्षात आफ्रिदी आणि गंभीर यांच्या ट्विटरवर जोरदार वाद होताना आपण पाहिले आहेत. मग ते क्रिकेटच्या बाबतीत असो किंवा राजकीय क्षेत्राशी निगडीत असो. दोघंही सडेतोड भूमिका मांडतात. कालच्या सामन्याबाबत 'आज तक' या वृत्तवाहिनीशी बोलताना शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा गंभीरला डिवचलं. या कार्यक्रमात भारताचा माजी फिरकीपटू आणि गंभीरचा सहकारी खेळाडू हरभजन सिंग देखील उपस्थित होता. आफ्रिदीनं केलेल्या विधानावर हरभजनही हसला. यावर आता भारतीय चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.
नेमकं घडलं काय?भारत-पाकिस्तान सामन्याबाबतच्या 'आज तक' वाहिनीवरील चर्चासत्रात हरभजन सिंग आणि शाहिद आफ्रिदी सहभागी झाले होते. यात शाहिद आफ्रिदीनं गंभीरबाबत वादग्रस्त विधान केलं. "माझं भारतीय संघातील खेळाडूंशी कधीच वैयक्तिक पातळीवर भांडण झालेलं नाही. मला आजही भारतातून मेसेज येतात. माझं कुणासोबत भांडण झालय वगैरे असं काही घडलेलं नाही. सोशल मीडियात माझं आणि गौतमचं भांडण होत असतं. पण गौतम एक असा व्यक्ती आहे की ज्याला भारतीय संघातील खेळाडू देखील पसंत करत नाहीत", असं शाहिद आफ्रिदी म्हणाला. त्यानंतर एकच हशा पिकला. अगदी हरभजन सिंग देखील आफ्रिदीच्या विधानावर स्मितहास्य करताना दिसला. आफ्रिदीच्या विधानावर हरभजननं अशा पद्धतीनं व्यक्त होणं नेटिझन्सला पटलेलं नाही. भारतीय चाहत्यांनी हरभजनच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.
ट्विटवर हरभजन सिंग मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे आणि शाहिद आफ्रिदीच्या विधानाचा समाचार देखील घेत आहेत. भारतीय संघातील खेळाडूच काय तर संपूर्ण देश पसंत करतो, अशा प्रतिक्रिया देत नेटिझन्स आफ्रिदीच्या विधानाचा समाचार घेत आहेत. तर आफ्रिदीच्या विधानाला प्रत्युत्तर देण्याऐवजी हरभजन सिंगही हसून त्यास दुजोरा देत आहे हे अतिशय निराशाजनक असल्याचंही भारतीय क्रिकेट चाहते म्हणत आहेत.