Pakistan Team in ODI World Cup 2023 : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली भारतात दाखल झालेल्या पाकिस्तान संघने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. शनिवारी त्यांचा मुकाबला यजमान भारताविरुद्ध होणार आहे आणि भारतानेही दोन्ही सामने जिंकून सरस नेट रन रेट बनवला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) काश्मीरच्या मुद्यावर भाष्ट केले आहे.
एका शोमध्ये आफ्रिदीला पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाबद्दल आफ्रिदीला विचारण्यात आले होते आणि त्यातही त्याने काश्मीर मुद्दा उकरून काढला. कार्यक्रमादरम्यान एका दर्शकाने विचारले की पाकिस्तानी संघ आपले क्षेत्ररक्षण कधी सुधारेल.या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी संघाच्या खराब क्षेत्ररक्षणावर बरीच टीका होत आहे. श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानी खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षणामुळे झेल सोडले नाहीत तर धावाही होऊ दिल्या. आफ्रिदीला पाकिस्तानी संघाच्या क्षेत्ररक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
- अँकरने त्याला विचारले- लाला, पाकिस्तान संघ आपले क्षेत्ररक्षण कधी सुधारणार?
- हा प्रश्न ऐकून आफ्रिदी हसला आणि म्हणाला- हा प्रश्न आणि काश्मीर मुद्दा खूप जुना आहे. क्षेत्ररक्षणात सक्रिय राहावे लागेल. जोपर्यंत तुम्ही क्षेत्ररक्षणाचा आनंद घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यापासून लपण्याच प्रयत्न करता किंवा फक्त ५० षटकेच पूर्ण करता येतील असा विचार करता. असं असेल तर तुम्ही चांगला क्षेत्ररक्षक होऊ शकत नाही.
Web Title: Shahid Afridi Compares Pakistan Cricket Team's Fielding Woes To 'Old Kashmir Problem', Video Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.