Join us  

Great work Pakistan!; पाकिस्तान संघानं झिम्बाब्वेला लोळवलं अन् शाहिद आफ्रिदीनं उधळली स्तुतीसुमनं!

पाकिस्तानी संघानं मागील आठवड्यात झिम्बाब्वेवर दुसऱ्या कसोटीत एक डाव व 147 धावांनी विजय मिळवून मालिका 2-0 अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 10:36 AM

Open in App

पाकिस्तानी संघानं मागील आठवड्यात झिम्बाब्वेवर दुसऱ्या कसोटीत एक डाव व 147 धावांनी विजय मिळवून मालिका 2-0 अशी खिशात घातली. अबीद अली ( 215) व अझर अली ( 126) यांच्या फटकेबाजीनंतर हसन अली, नौमान अली व शाहिद आफ्रिदी यांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेत पाकिस्तानच्या विजयात हातभार लावला. पाकिस्ताननं पहिला डाव 8 बाद 510 धावांवर घोषित केला, प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा पहिला डाव 132 व दुसरा डाव 231 धावांवर गडगडला. बाबर आजमच्या ( Babar Azam ) नेतृत्वाखाली पाकिस्ताननं याआधी ट्वेंटी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता. या दौऱ्यावरील संघाच्या कामगिरीवर माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं ( Shahid Afridi) स्तुतीसुमनं उधळली. 

झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात हसन अलीनं 27 धावांत 5 विकेट्स घेतल्या. साजीद खाननं दोन, शाहिन आफ्रिदी व तबीश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात झिम्बाब्वेकडून थोडा संघर्ष पाहायला मिळाला. रेगीस चाकब्वा ( 80) व कर्णधार ब्रेंडन टेलर ( 49) यांनी चांगला खेळ केला. पण, नौमन अली ( 5-86) व शाहिन ( 5-52) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. बाबर आजम यानं कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सलग चार सामने जिंकले. असा पराक्रम करणारा तो पहिलाच पाकिस्तानी खेळाडू आहे.  शिवाय प्रथम पाकिस्तानच्या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजांनी सर्व दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.  

शाहिद आफ्रिदीनं ट्विट केलं की, पाकिस्तानी संघानं उल्लेखनीय कामगिरी केली. जेव्हाजेव्हा शक्य आहे तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करणे महत्त्वाचे असते आणि पाकिस्तानी संघानं तेच केलं. अझर, अबीद, नौमान, शाहिन आणि हसन यांचे कौतुक. झिम्बाब्वेला आणखी बरंच काही शिकावं लागेल.  

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानझिम्बाब्वे