भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्यातील वाद हे जगजाहीर आहे. क्रिकेटच्या मैदानावरील वाद आता दोघांच्या निवृत्तीनंतरही सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे दोघंही एकमेकांना सडेतोड उत्तर देण्याची आणि एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आफ्रिदीनं काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याला गंभीरनं त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. पण, आज आफ्रिदी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आफ्रिदीला कोरोना झाल्याची माहिती समोर आली आणि तो लवकर बरा व्हावा यासाठी अनेक क्रिकेटपटूंनी प्रार्थना केली. गंभीरनंही यावेळी त्याचं मत मांडलं.
Big News : लोकेश राहुल, स्मृती मानधनासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना 'NADA'ची नोटीस
कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आफ्रिदी अनेक गरजूंना सातत्यानं मदत करत आहे. त्यानं शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाकिस्तानातील अनेक भागांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले. या कालावधीत तो अनेक लोकांना भेटला आणि त्यामुळेच त्याला कोरोना झाल्याची चर्चा सुरू आहे. आफ्रिदीनं सोशल मीडियावरून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्यानं लिहिलं की,''गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली होती. माझे शरीर प्रचंड दुखत होते. त्यानंतर मी वैद्यकिय चाचणी केली आणि त्यात कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मला आता तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.''
तो पुढे म्हणाला,'' फक्त आफ्रिदीच नव्ह, तर सर्व माझ्या देशातील सर्व नागरिक लवकर बरे व्हावेत ही माझी इच्छा आहे. माझ्या देशातील लोकांची मला चिंता वाटते. पाकिस्ताननं भारताला मदत देऊ केली, परंतु त्यांनी स्वतःच्या देशाची आधी मदत करावी. मदत देऊ केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.''
अझर अली, सर्फराज खान, कामरान अकमल आदी अनेक क्रिकेटपटूंनी आफ्रिदीच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भारतीय क्रिकेट वाटचालीचा साक्षीदार हरपला; माजी खेळाडूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास
अम्फान वादळ: दहा हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी सौरव गांगुली रस्त्यावर!
ऑस्ट्रेलियातील रस्त्यांवर झळकतायत कोहली, तेंडुलकर यांच्या नावाचे फलक; जाणून घ्या कारण
जादू की भूत? आकाश चोप्रानं शेअर केला भयावह Video; तुम्हालाही बसेल धक्का
आलिशान रिसॉर्टचा मालक आहे 'हा' क्रिकेटपटू; एका दिवसासाठी मोजावे लागतात 88 हजार !
अखेरचा गोल!, फुटबॉलपटूचे शव घेऊन सहकारी पोहोचले मैदानावर; Video पाहून आवरणार नाहीत अश्रू