Join us  

शाहिद आफ्रिदीला UAEत प्रवेश नाकारला; पुन्हा जावे लागले कराचीत!

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) अजूनही फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: January 27, 2021 2:20 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) अजूनही फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत आहे. त्यामुळे जगातील अनेक फ्रँचायझी लीगमध्ये त्याच्यासाठी चुरस रंगलेली पाहायला मिळतेच. आता तो अबुधाबी येथे होणाऱ्या T10 लीगसाठी सज्ज आहे, परंतु त्याला एका छोट्याश्या अडचणीचा सामना करावा लागला आहे.  

टी 10 लीगमध्ये आफ्रिदी कलंदर्स संघाचे प्रतिनिधित्व करणार असून विसाच्या कारणास्तव त्याचा यूएईतील प्रवास लांबणीवर पडला आहे. दी न्यू ( पाकिस्तान) यांनी दिलेल्या वृत्तानुसार माजी खेळाडूचं UAEतील वास्तव्याचा कालावधी संपलेला आहे, परंतु UAEत दाखल होईपर्यंत ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही.

 विसा अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही गोष्ट लपली नाही आणि त्यांनी त्वरित आफ्रिदीला प्रवेश देण्यास नकार दिला. आफ्रिदाली विसा रिन्यू करण्यासाठी आता कराचीत जावे लागले. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तो आता यूएईल दाखल होऊ शकतो.  

''अबुधाबीत होणाऱ्या या T10 लीगने जगभरातील अनेक क्रिकेटपटूंना आकर्षित केले आहे. या लीगचे चौथे सत्राची घोषणा करताना आनंद होत आहे. ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक ही मोठी नावं यंदा खेळणार आहेत,'' असे या लीगचे चेअरमन शाजी उल-मुल्क यांनी सांगितले.  

मराठा अरेबियन्सन आणि नॉर्दर्न वॉरियर्स यांच्यात २८ जानेवारीला सलामीचा सामना होणार आहे. आफ्रिदी प्रतिनिधित्व करणाऱ्या कलंदर्स संघाचा पहिला सामना २९ जानेवारीला पुणे डेव्हिल्ससोबत होणार आहे.  

टॅग्स :शाहिद अफ्रिदीटी-10 लीगसंयुक्त अरब अमिराती