शाहिद आफ्रिदीनं केली युवराज सिंगला आर्थिक मदत; दिले लाखो रुपये, पण का?

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्यातील मैदानावरील टशन सर्वांना माहित आहेच.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 08:39 AM2019-08-08T08:39:33+5:302019-08-08T08:40:17+5:30

whatsapp join usJoin us
Shahid Afridi Donated $10,000 and a T-Shirt to Yuvraj Singh Foundation You We Can | शाहिद आफ्रिदीनं केली युवराज सिंगला आर्थिक मदत; दिले लाखो रुपये, पण का?

शाहिद आफ्रिदीनं केली युवराज सिंगला आर्थिक मदत; दिले लाखो रुपये, पण का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कॅनडा : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्यातील मैदानावरील टशन सर्वांना माहित आहेच. त्यात आफ्रिदीनं नुकतेच 'कलम 370' रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केली होती. आफ्रिदीनं नेहमीच काश्मीर मुद्यावर भारतविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच येथील क्रिकेट चाहत्यांच्या तो नेहमी टार्गेटवर असतो. पण, बुधवारी चक्क आफ्रिदीनं सिक्सर किंग युवीला आर्थिक मदत म्हणून लाखो रुपये दिले.. पण का?

युवराज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये सहभागी झाला आहे. या लीगमधील त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नसले तरी गर्दी खेचण्यात तो यशस्वी झाला आहे. युवीसह या लीगमध्ये वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकलम, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी हेही येथे विविध संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

याच लीग दरम्यान आफ्रिदीनं युवीला 10000 डॉलर म्हणजेच जवळपास 7 लाख रुपयांची मदत केली. बुधवारी कॅनडात आयोजित कार्यक्रमात आफ्रिदीनं ही घोषणा केली. कँसरवर मात करून पुन्हा क्रिकेट मैदानावर परतलेल्या युवीनं कँसरग्रस्त लोकांसाठी चालवलेल्या 'YouWeCan' या फाऊंडेशनसाठी आफ्रिदीची ही मदत होती. आफ्रिदीही अशीच एक फाऊंडेशन चालवतो आणि युवीच्या उपक्रमासाठी त्यानं ही मदत केली. 



Jammu and Kashmir: काळजी नसावी... पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही लवकरच सोडवू; गौतम गंभीरनं शाहिद आफ्रिदीला 'चोपलं'

जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याबाबतची, त्यातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. या ऐतिहासिक निर्णयाचे देशभरात आनंदाचे वातावरण असताना पाकिस्तानात मात्र टीका होत आहे. नेहमी भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या पाक क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. आफ्रिदीच्या या ट्विटवर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं जोरदार हल्ला केला आहे. तो म्हणाला,''भारताच्या या ऐतिहासिक निर्णयावर आफ्रिदीनं टीका केली आहे. त्याला हे मानवतेचा गळा घोटणारे पाऊट वाटते. पण, हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये रोज घडते, याचा उल्लेख करायला तो विसरला आहे. चिंता नसावी, लवकरच तोही प्रश्न आम्ही लवकरच सोडवू.''

Web Title: Shahid Afridi Donated $10,000 and a T-Shirt to Yuvraj Singh Foundation You We Can

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.