Join us

Video : 'तू जन्मलाही नव्हतास तेव्हा मी आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं!'; शाहिद आफ्रिदीनं २१ वर्षीय खेळाडूला झापलं 

लंका प्रीमिअर लीगमध्ये आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ग्लॅडिएटर्स संघाला तीन सामन्यांत विजयाची चव चाखता आलेली नाही. सोमवारी टस्कर्स संघाकडूनही त्यांना हार मानावी लागली.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 1, 2020 09:17 IST

Open in App
ठळक मुद्देशाहिद आफ्रिदी या ना त्या कारणानं नेहमी चर्चेत राहतोचआफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ग्लॅडिएटर्स संघाची विजयाची पाटी कोरीचसहकारी मोहम्मद आमीरला अपशब्द बोलला म्हणून आफ्रिदीचा पारा चढला

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) या ना त्या कारणानं नेहमी चर्चेत राहतोच... कधी मैदानावरील आपल्या फटकेबाजीनं, तर कधी वाचाळ वक्तव्यांनी आफ्रिदीनं नेहमी स्वतःभवती चर्चेचं वर्तुळ निर्माण केलं. लंका प्रीमिअर लीगमध्येही ( Lanka Premier League) ४० वर्षीय आफ्रिदीनं दोन दिवसांपूर्वी दमदार खेळीनं वाहवाह मिळवली होती. मात्र, सोमवारी तो एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला. कँडी टस्कर्स संघानं सोमवारी झालेल्या सामन्यात गॅल ग्लॅडिएटर्सवर विजय मिळवला. या सामन्यात बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. सामन्यानंतर आफ्रिदीनं केलेल्या कृतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ग्लॅडिएटर्स संघाला तीन सामन्यांत विजयाची चव चाखता आलेली नाही. सोमवारी टस्कर्स संघाकडूनही त्यांना हार मानावी लागली. या सामन्यात अफगाणिस्तानच्या २१ वर्षीय नवीन-उल-हक याच्याशी ग्लॅडिएटर्सच्या मोहम्मद आमीर आणि शाहिद आफ्रिदी यांची शाब्दिक बाचाबाची झाली. १८व्या षटकात याला सुरुवात झआली. टस्कर्सच्या गोलंदाज नवीन-उल-हक याच्या गोलंदाजीवर आमीरनं चौकार मारला. षटक पूर्ण केल्यानंतर नवीन-उल-हकनं आमीरप्रती अपशब्द वापरले आणि त्यानंतर दोघंही एकमेकांना भांडणासाठी उभे राहिले. अन्य सहकाऱ्यांनी त्यांना दूर नेले. 

इथेच हा वाद संपला नाही, तर २० व्या षटकात आमीरनं षटकार खेचला आणि नवीनकडे तो रागाने पाहत काहीतरी बोलला. पुन्हा एकदा सहकाऱ्यांनी दोघांना शांत केले. पण, सामना संपल्यानंतर जेव्हा सर्व खेळाडू एकमेकांशी हात मिळवत होते, तेव्हा आफ्रिदीनं नवीन-उल-हकला झापलं. नवीन समोर येण्यापूर्वी आफ्रिदी प्रतिस्पर्धी संघातील अन्य खेळाडूंशी हसून गप्पा मारत होता. पण, नवीन समोर येताच आफ्रिदीचा पारा चढला, क्या हो गया? असं त्यानं रागात विचारले. पुढे तो हेही म्हणाला, मी पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता.

पाहा व्हिडीओ...  टस्कर्सने २५ धावांनी हा सामना जिंकला. १९७ धावांचा पाठलाग करताना ग्लॅडिएटर्सच्या दानुश गुणथिलकानं ५३ चेंडूंत ८२ धावा चोपल्या, परंतु संघाला ७ बाद १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली.   

टॅग्स :शाहिद अफ्रिदीश्रीलंकाअफगाणिस्तान