पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा ( Shaheen Shah Afridi) याचं लग्न माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या (shahid afridi) थोरल्या मुलीसोबत शाहीन होणार आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं सोशल मीडियावर पोस्ट करून ही गुड न्यूज दिली. शाहिनच्या कुटुंबीयांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. साखरपुड्याची नेमकी तारीख अद्याप कळू शकलेली नाही.
"शाहिन आणि शाहिद आफ्रिदीची थोरली मुलगी अक्सा आफ्रिदी यांचा साखरपुडा निश्चित झाला आहे. दोन्ही कुटुंबीयांनी गेल्या अनेक वर्षांपासूनच्या ओळखीचं रुपांतर आता नातेसंबंधांत बदलण्याचं ठरवलं आहे", असं शाहीनचे वडील अयाज खान म्हणाले. २० वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीननं २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने २२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४५ विकेट्स घेतल्या आहेत. तर २१ टी२० सामन्यात २४ विकेट्स आणि १५ टी२० सामन्यात ४८ विकेट्स घेतल्या आहेत.
काय आहे दुल्हे राजा प्रकरण?शाहिद आफ्रिदीनं ही आनंदाची बातमी शेअर करताच सोशल मीडियावर गोविंदाच्या 'दुल्हे राजा' या गाण्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील २०१८ सालचा हा व्हिडीओ आहे. ज्यात शाहिनच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर आफ्रिदीनं जोरदार षटकार खेचला, परंतु पुढच्याच चेंडूवर शाहिननं मधला स्टम्प उडवून शाहिद आफ्रिदीला बाद केले.
पाहा व्हिडीओ..