Join us  

तो तर आता चालूही शकत नाही! जावई शाहिनच्या बचावासाठी सासरा मैदानात, शोएब अख्तरला सुनावले

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने ( Shoiab Akhtar) एका मुलाखतीत युवा गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भूमिकेबद्दल टीका केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 4:04 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने ( Shoiab Akhtar) एका मुलाखतीत युवा गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भूमिकेबद्दल टीका केली होती. गतवर्षी झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्याने दुखापतीमुळे पूर्ण षटकं फेकली नव्हती. त्यावर प्रतिक्रिया देताना अख्तरने शाहिनचे कान टोचले होते. शाहिन आफ्रिदीने पाकिस्तानातील मोठा सेलिब्रेटी होण्याची संधी गमावली. दुखापतग्रस्त असूनही त्याने ते षटक पूर्ण केले असते, तर तो हिरो ठरला असता, असे अख्तर म्हणाला होता.

''शाहिन आफ्रिदीच्या जागी मी असतो तर त्या १२ मिनिटांत गोलंदाजी करून मी पाकिस्तानसाठी मोठा सेलिब्रेटी झालो असतो. मी गोलंदाजी केली असती, पडलो असतो, गुडघा तुटला असता तरीही मी पुन्हा उभा राहिलो असतो, इंजेक्शनं घेतली असती आणि गोलंदाजी केली असती,''असे अख्तर म्हणाला.

अख्तरच्या या विधानावर शाहिनचे सारसा आणि माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.''शोएब अख्तरनं एवढी इंजेक्शनं घेतली आहेत की तो आता चालूही शकत नाही. हे बघा, तो शोएब अख्तरचा क्लास आहे. तो हे करू शकतो. हे आव्हानात्मक आहे, प्रत्येकजण शोएब अख्तर बनू शकत नाही. इंजेक्शन किंवा पेन किलर घेऊन खेळणं अवघड असतं. कारण, तसं करून तुम्ही दुखापतीला आणखी बळावण्याचा धोका पत्करता. त्यामुळे शोएब अख्तरला एकट्याला सोडा,''असे आफ्रिदी म्हणाला.  

 'इंग्रजी' येत नसल्याने बाबर आजम मोठा ब्रँड झाला नाही - अख्तरपाकिस्तानातील स्थानिक चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अख्तरने बाबरसह पाकिस्तानी खेळाडूंच्या इंग्रजीची खिल्ली उडवली. तो म्हणाला,''प्रेझेंटेसन सेरेमनीमध्ये हे खेळाडू कसे गोंधळलेले पाहायला मिळतात. इंग्रंजी शिकणं आणि बोलणं किती अवघड आहे? क्रिकेट खेळणं वेगळं अन् मीडियाशी संवाद साधता येणं वेगळं. तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही तुमचं मत टीव्हीवर व्यक्त करण्यात अपयशी ठराल. बाबर आजम हा पाकिस्तानातील मोठा ब्रँड होऊ शकतो आणि हे मी दाव्याने सांगतो. पण, तो आतापर्यंत का मोठा ब्रँड होऊ शकला? कारण, त्याला इंग्रजी बोलता येत नाही.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :शोएब अख्तरशाहिद अफ्रिदी
Open in App