पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्या खासगी चॅट लीक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पाकिस्तानच्या कर्णधाराच्या चॅट व्हायरल करण्यामागे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाका अश्रफ यांचे नाव समोर येऊ लागले आहे. या प्रकरणावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) म्हणाला की, हे अत्यंत वाईट कृत्य आहे. आपणच आपल्या देशाची बदनामी करत आहोत.
वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबरच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पीसीबीचे अध्यक्ष त्याचा फोन उचलत नसल्याची बातमीही आली. आता एका टीव्ही शोमध्ये त्याच्या खाजगी चॅटचा स्क्रीनशॉट दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये त्याला विचारण्यात आले होते की, अध्यक्ष तुमचा फोन उचलत नसल्याची बातमी आहे. त्याला उत्तर देताना बाबरने त्या व्यक्तीला सांगितले की, आपण सरांना कोणताही फोन केला नाही. या चॅटिंगचा स्क्रीनशॉट एका पाकिस्तानी चॅनलवर दाखवण्यात आला, त्यानंतर पाकिस्तानमध्ये वादळ उठले.
आता आफ्रिदी एका टीव्ही शोमध्ये म्हणाला की, आम्ही स्वतः आमच्या खेळाडूंची आणि आमच्या कर्णधाराची इतकी बदनामी करत आहोत. त्याचे खाजगी चॅट टीव्हीवर कसे दाखवता येतील आणि तेही त्यांच्या कर्णधाराचे? फोन न उचलण्याच्या पूर्वीच्या ट्रेंडला विरोध करण्यासाठी हा खेळ खेळला गेला.
तो म्हणाला, एवढं वाईट करण्याची काय गरज आहे? ही पद्धत चांगली नाही. हे माध्यमात का आणले गेले? अध्यक्षांनी बाबरचे चॅटिंग मीडियासमोर आणणाऱ्या व्यक्तीला या सर्व गोष्टी समोर आणण्यास सांगितले होते. ही कोणत्या स्तराची कृती आहे? अध्यक्षांनी असे केले असेल तर ती अत्यंत वाईट गोष्ट आहे.
Web Title: Shahid Afridi hits out at Pakistan media and PCB chairman for leaking Babar's private messages
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.