पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पाकिस्तानातील गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहे. कोरोना व्हायरसमुळे येथील बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन काम करत आहे आणि आतापर्यंत त्यांनी 2000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटल्या आहेत. मंगळवारी शाहिद आफ्रिदीनं त्यांच्या या समाजकार्याची माहिती देणारं ट्विट केलं. त्यात त्यानं पाकिस्तानातील अल्पसंख्यांक म्हणजेच हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबीयांना मदत केल्याची माहिती दिली.
त्यानं ट्विट केलं की,''शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन पाकिस्तानातील गरजू अल्पसंख्यांकांना रेशन पुरवण्याचं काम करत आहे. कराची येथील हिंदू आणि ख्रिश्चन समाजाला आज रेशन पुरवण्यात आलं.''
अऩ्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला