Join us  

Shahid Afridi Mega Stars League : शाहिद आफ्रिदीने केली T10 लीगची घोषणा; पाकिस्तान सुपर लीगमध्ये संधी मिळत नसल्याने घेतला निर्णय

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) स्वतःची T10 लीग  खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मेगा स्टार लीग Mega Star League (MSL) असे त्याच्या लीगचे नाव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 3:28 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) स्वतःची T10 लीग  खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मेगा स्टार लीग Mega Star League (MSL) असे त्याच्या लीगचे नाव आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू, खेळाडू आणि क्रीडा पत्रकार यांच्यासाठी आफ्रिदीने ही लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात ही लीग खेळवण्यात येणार आहे. 

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक, वकार युनीस आणि मुश्ताक अहमद यांच्या उपस्थितीत आफ्रिदीने ही घोषणा केली. हेही या लीगमध्ये खेळणार आहेत. या लीगमध्ये सहा संघांचा समावेश असणार आहे, अशी माहिती आफ्रिदीने दिली.''मेगा स्टार लीग ही सर्वांचे मनोरंजन करणारी लीग ठरले. रावळपिंडी येथे सप्टेंबर महिन्यात ती खेळवण्यात येईल. माजी क्रिकेटपटू, खेळाडू आणि क्रीडा पत्रकार यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी ही लीग खेळवण्यात येणार असल्याचे आफ्रिदीने सांगितले.

सहा संघाचा समावेश या लीगमध्ये असतील आणि काही परदेशी खेळाडूही MSL मध्ये खेळतील, असेही आफ्रिदीने स्पष्ट केले.  ही लीग खेळवण्यामागचे प्रमुख कारण सांगताना आफ्रिदी म्हणाला, त्याच्यासारख्या वयस्कर खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही, खास त्यांच्यासाठी MSL चे आयोजन करण्यात येणार आहे. PSL ही युवा खेळाडूंसाठी आहे. मी आता काही युवा राहिलेलो नाही. मी, मुश्ताक अहमद, इंझमाम-उल-हक आणि वकार युनीस हे MSL मध्ये खेळणार आहेत. 

पाकिस्तानसाठी शाहिद आफ्रिदीने २७ कसोटीत १७१६  धावा व ४८ विकेट्स, ३९८ वन डेत ८०६४ धावा व ३९५ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त ९९ सामन्यांत १४१६ व ९८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अन्य ट्वेंटी-२०त ३२९ सामन्यांत ४३९९ धावा व ३४७ विकेट्स आहेत. 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीटी-10 लीगपाकिस्तान
Open in App