Shahid Afridi : वन डे क्रिकेट कंटाळवाणे, ४० षटकांचा सामना खेळवा; शाहिद आफ्रिदीने सल्ला देताना पाकिस्तानी चाहत्यांची काढली अक्कल

Shahid Afridi on ODI cricket : पाकिस्तानचा माजी कर्णधार-अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला आता वन डे क्रिकेट कंटाळवाणं वाटू लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 06:41 PM2022-07-21T18:41:01+5:302022-07-21T18:41:21+5:30

whatsapp join usJoin us
Shahid Afridi "One-day cricket has become quite boring now. I would suggest to cut ODI cricket from 50 overs to 40 overs inorder to make it entertaining." | Shahid Afridi : वन डे क्रिकेट कंटाळवाणे, ४० षटकांचा सामना खेळवा; शाहिद आफ्रिदीने सल्ला देताना पाकिस्तानी चाहत्यांची काढली अक्कल

Shahid Afridi : वन डे क्रिकेट कंटाळवाणे, ४० षटकांचा सामना खेळवा; शाहिद आफ्रिदीने सल्ला देताना पाकिस्तानी चाहत्यांची काढली अक्कल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shahid Afridi : ३९८ वन डे सामने, ८०६४ धावा, ६ शतकं व ३९ अर्धशतकांसह ३९५ विकेट्स नावावर असलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार-अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला आता वन डे क्रिकेट कंटाळवाणं वाटू लागले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ५० षटकांच्या क्रिकेटच्या भवितव्यावर अनेक जण भाष्य करू लागले आहेत. सतत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिका, फ्रँचायझी लीग यामुळे क्रिकेटपटू थकून जातात. त्यामुळे अनेकांना तीनही फॉरमॅटमध्ये १०० टक्के योगदान देणे जमत नाही. त्यात आता आफ्रिदीने भन्नाट आयडिया दिली आहे.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम आफ्रिदीकने १९९६ साली श्रीलंकेविरुद्ध नोंदवला होता. ३७ चेंडूंतील शतकाचा विक्रम हा १७ वर्ष त्याच्याच नाववर राहिला.  आफ्रिदीने पाकिस्तानकडून २७ कसोटी, ३९८ वन डे व ९९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. वन डे क्रिकेटबाबत आफ्रिदी म्हणाला, आता वन डे क्रिकेट कंटाळवाणे झाले आहे. त्यामुळे ते अधिक मनोरंजक बनवण्यासाठी ५० ऐवजी ४० षटकांचा सामना खेळवावा असा मी सल्ला देईन.


याआधी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, पाकिस्ताचा माजी दिग्गज गोलंदाज वसिम अक्रम यांनीही वन डे क्रिकेट कमी करण्यावर भर दिला आहे. आफ्रिदी पुढे म्हणाला, जेव्हा मी पेशावर येथे झिम्बाब्वे येथे वन डे सामना खेळत होतो तेव्हा दुर्दैवाने मी पहिल्या चेंडूवर बाद झालो. त्यानंतर चाहते आंदोलन करू लागले आणि आफ्रिदीला पुन्हा फलंदाजी करायला द्या, कारण पहिला चेंडू ट्राय बॉल होता, अशी घोषणा बाजी ते करत होते. 

Web Title: Shahid Afridi "One-day cricket has become quite boring now. I would suggest to cut ODI cricket from 50 overs to 40 overs inorder to make it entertaining."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.