4 ऑक्टोबर 1996 ही तारीख वन डे क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिली गेली आहे. 16 वर्षीय शाहिद आफ्रिदीनं तेव्हा अवघ्या 37 चेंडूंत शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकटेमधील ते सर्वात जलद शतक होतं. त्यानं श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना 11 षटकार व 6 चौकार खेचून 102 धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम 2014मध्ये न्यूझीलंडच्या कोरे अँडरसननं ( विरुद्ध वेस्ट इंडिज) मोडला. पाकिस्तानच्या माजी फलंदाजाचं हे जलद शतक आणि सचिन तेंडुलकरची बॅट यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे. ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
पाकिस्तानातल्या मंदिरात शाहिद आफ्रिदी करतोय जीवनावश्यक वस्तूंचं वाटप
नैरोबी येथे 1996मध्ये खेळवण्यात आलेल्या त्या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 371 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार सईद अन्वरनं 120 चेंडूंत 13 चौकार व 1 षटकारासह 115 धावा केल्या. पण, 16 वर्षीय आफ्रिदीनं हा सामना गाजवला. त्यानं 40 चेंडूंत 102 धावा चोपल्या. त्यानं 37 चेंडूंत शतक पूर्ण करून विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला 289 धावा करता आल्या. अरविंद डीसिल्वानं 122 धावांची खेळी केली होती. आफ्रिदीनं गोलंदाजीतही कमाल करताना एक विकेट घेतली होती.
आफ्रिदीचं हे वादळी शतक महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या बॅटीतून साकारलं गेलं होतं. आफ्रिदीनं त्याच्या आत्मचरित्रात हे सांगितलं. गेम चेंजर या आत्मचरित्रात त्यानं लिहिलं की,''सचिन तेंडुलकरनं त्याची बॅट वकार युनूसला दिली होती. सिआलकोट येथे त्या बॅटची प्रतिकृती बनवली जाणार होती, परंतु ती बॅट सिआलकोट येथे पोहोचण्यापूर्वी माझ्या हातात आली. फलंदाजीला जाण्यापूर्वी युनूसनं ती बॅट मला दिली.''
IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत
Video : सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा अन् हरभजन सिंग यांना युवराज सिंगचं चॅलेंज
Video : दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या घरी अचानक आले दिल्ली पोलीस अन्...